पाच वर्षात ५ अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था बनणं अशक्य : सी. रंगराजन

आज आपल्या देशाची अर्थव्यवस्था २.७ अब्ज डॉलर्सची आहे. पुढील पाच वर्षात आपण देशाची अर्थव्यवस्था ५ अब्ज डॉलर्स करण्याच्या गोष्टी करत आहोत. हे लक्ष्य गाठण्यासाठी वार्षिक नऊ टक्के दरानं विकास होण्याची आवश्यकता आहे. अशातच २०२५ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ५ अब्ज डॉलर्सची होण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर सी. रंगराजन यांनी व्यक्त केलं. एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

‘यशराज फिल्म्स’ अडचणीत येण्याची शक्यता

देशातील सर्वात मोठी फिल्म कंपनी असलेलली ‘यशराज फिल्म्स’ अडचणीत येण्याची शकयता निर्माण झाली आहे. ‘यशराज फिल्म्स’ विरोधात १०० कोटींच्या फसवणुकी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बॉलीवूड मध्ये मोठी खळबळ माजली आहे. ‘द इंडियन परफॉर्मिंग राईट्स सोसायटी’ यांच्या तक्रारीनंतर हा दाखल करण्यात आला असल्याचे उघड झाले आहे. ‘यशराज फिल्म्स’ कंपनी हि प्रसिद्ध निर्माता , दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या मालकीची आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांची मुले आदित्य चोप्रा आणि उदय चोप्रा कंपनी सांभाळत आहेत.

धोनीच्या पत्नीसमोर स्टार अभिनेत्री फेल

भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा आपल्या दमदार खेळीसाठी प्रसिध्द आहे. मात्र गेल्या तीन-चार महिन्यांपासून धोनी क्रिकेटपासून दूर आहे. धोनी सध्या आपली पत्नी साक्षी आणि मुलगी झिवासोबत वेळ घालवत आहे. धोनी आणि साक्षी दोघंही कपल गोल्स म्हणून ओळखले जातात. धोनीला अडचणीच्या काळात सावरणाऱ्या साक्षीचा आज 31वा वाढदिवस आहे.

बहुचर्चित ‘धुरळा’ या मराठी सिनेमाचा टीजर प्रदर्शित 

एकीकडे राज्यामध्ये सत्ता स्थापनेवरून राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु असताना काही दिवसांपूर्वी मराठी कलाकारांच्या ट्विटरवरील एका वेगळ्या भूमिकेमुळे सर्वत्र चांगलीच चर्चा रंगली होती. मराठी चित्रपटसृष्टीमधील बडे कलाकार असलेले सई ताम्हणकर , अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी अशा अनेक कलाकारांनी ‘#पुन्हानिवडणूक?’ असं लिहून ट्विट केलं होत. मराठीतील हे मोठे कलाकार अचानक हा हॅशटॅग का वापरत आहेत असा प्रश्न चाहत्यांना पडला. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी आणि सत्तापेच लक्षात घेता हे कलाकार काहीतरी राजकीय भाष्य करत आहेत असं अनेकांना वाटलं. 

‘good news’ , बऱ्याच दिवसांनी तगड्या कॉमेडी कंन्टेन्टसह येतोय ‘गुड न्यूज’ – पहा ट्रेलर

बऱ्याच दिवसांनी कॉमेडी मुव्हीसाठी चांगला कन्टेन्ट घेऊन येतोय ‘गुड न्यूज’ हा चित्रपट … आजकाल अनेक चित्रपट हे प्रेक्षकांना हसवण्यासाठी अक्षरशः काहीही संवाद आणि सिन क्रिएट केले जातात . पण गुड न्यूजच्या ट्रेलरनेच दर्शक खुश होईल . त्यात अक्षय कुमार , करीना कपूर , कियारा अडवाणी आणि दिलजीत दोसांझ अशी स्टारकास्ट आहे . त्यामुळे प्रेक्षांची आतुरता वाढते आहे . पाच दिवसात लाखो लोकांनी ट्रेलरला पसंती दिली आहे .

टोल वसुली विरोधात लोटांगण घालून आंदोलन

रस्ता दुरूस्त न करताच केल्या जाणाऱ्या टोल वसुली वियोधात रविवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलय. नागरिकांनी केलेल्या या आंदोलनामुळे कासेगाव-टाकळी या बाह्य रस्त्यावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.

अतिवृष्टीने शेतकरी देशोधडीला, उभ्या सोयाबीन पिकावर फिरविला ट्रॅक्टर

अतिवृष्टीमुळे शेतकरी पुरता देशोधडीला लागला आहे. कर्जबाजारी होत, बैलजोडी विकून शेतकऱ्यांनी शेती केली. मात्र पावसामुळे पीक मातीमोल झाले. त्यामुळे अतिवृष्टीने ओढवलेल्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याने काळजावर दगड ठेवत खराब झालेल्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरविला आहे.

वारकऱ्यांच्या मिनी बसला भीषण अपघात, १९ प्रवासी जखमी

रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटामध्ये पंढरपूरहून परतणाऱ्या वारकऱ्यांच्या मिनी बसला भीषण अपघात झाला. या अपघातात १९ वारकरी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

अयोध्येत राममंदिरच..!! मशीद बांधण्यासाठी ५ एकर जागा मिळणार

 दिल्ली प्रतिनिधी | भारत देशात दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या अयोध्या खटल्याची अंतिम सुनावणी आज सकाळी साडेदहा वाजता सुरू झाली. वादग्रस्त जागेवर राम मंदिर बनणार असल्याचं कोर्टाच्या निकालातून सिद्ध झालं आहे. या निकालात सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येतच ५ एकर जागा देण्याचं जाहीर करण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मावळते सरन्यायाधीश रंजन गोगोई, नवनिर्वाचित सरन्यायाधीश शरद बोबडे, न्या. चंद्रचूड … Read more

अखेर शिवसेनेने सूड उगवलाच; शेवटच्या दिवशी भाजप गुडघे टेकणार??

विशेष प्रतिनिधी | महाराष्ट्राच्या राजकारणाचा पोरखेळ थांबण्याचं नाव घेत नाहीये. देवेंद्र फडणवीस आज आपल्या पदाचा राजीनामा देणार असून सत्तास्थापन करण्याबाबत भाजपकडून कोणतीही पावलं उचलण्यात आलेली नाहीत. भाजपकडून आमदार फोडण्यासाठी २५ कोटींची ऑफर नाशिकमधील आमदारांना देण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शुक्रवारी सकाळीच दिली. यामुळे सत्तेची खुर्ची आपल्याकडे ठेवण्यासाठी भाजप आणखी कोणत्या खेळया करणार … Read more