धक्कादायक !!! पोलीस हेड कॉन्स्टेबलची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगली शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस हेड कॉन्स्टेबलने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. सदरचा प्रकार हा पहाटे पाऊने तीन वाजण्याच्या सुमारास विश्रामबाग पोलीस लाईन मध्ये घडला. रामचंद्र कृष्णा बिरणगे असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. कौटुंबिक तणावातून बिरणगे यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले … Read more

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या घरात 1 कोटी 41 लाखांची चोरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हाय प्रोफाईल प्रकरणे अनेकदा माध्यमांसमोर येण्यापासून रोखली जातात. सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या अमृता शेरगिल मार्गावरील घरावर फेब्रुवारी महिन्यात दरोडा पडला होता. प्रकरण मोठे असल्याने त्यावर तपास सुरू झाला मात्र त्यांनी हे प्रकरण समोर येऊ दिले नाही. मात्र आता या प्रकरणाशी संबंधित माहिती हळूहळू समोर येत आहे. वृत्तानुसार, सोनमच्या सासूने … Read more

दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक, सव्वादोन लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे कुपवाड मधील नितीन गणपती ताटे यांची मोटरसायकल 29 मार्च रोजी अज्ञात चोरट्याने हॉटेल अशोका जवळून चोरीली होती. याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावत दोघा संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून अधिक कसून चौकशी केली असता त्यांनी पाच गुन्हे केल्याची कबुली दिली. सदर गुन्ह्यात … Read more

खळबळजनक! यात्रा सुरु असताना जमावाचा पोलिसांवर हल्ला, इन्स्पेक्टरसह 5 कर्मचारी जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | परभणी प्रतिनिधी  परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील लाडनांद्रा येथे भैरवनाथाच्या बार्षिक यात्रेमध्ये चालू असलेल्या अवैध धंद्यावर कारवाई साठी गेलेल्या पाथरी पोलिसांच्या पथकावर स्थानिक अवैध धंदे चालक व यात्रेतील लोकांनी केलेल्या हल्ल्यामध्ये पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण यांच्यासह इतर पाच पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे जिल्हात … Read more

विनयभंग करणाऱ्या राजू कोरेला अटक करण्यासाठी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे भाजपाच्या जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दिराकडून एका महिलेचा विनयभंग करण्यात आला आहे. याबाबत त्या पीडितेची महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून विश्रामबाग पोलीस ठाण्यात राजू कोरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित राजू कोरेला अटक करण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांना निवेदन … Read more

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी मुनीर ख्वाजासाब शेख याला तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे इस्लामपूर येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मुनीर ख्वाजासाब शेख याला विनयभंग व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलमानुसार 3 वर्षे सश्रम कारावास व दीड हजार रूपये दंड, दंड न भरल्यास दीड महिना साध्या कारावासाची शिक्षा पहिले अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायाधीश एस.एम.चंदगडे यांनी ठोठावली. 3 मार्च 2018 रोजी सकाळी 7.30 च्या … Read more

अबब… चक्क शिवसेनेच्या जिल्हा अध्यक्षाच्या 50 हजारांवरच चोरट्याने मारला डल्ला (Video)

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगलीतल्या स्टेशन चौक येथे शिवसेनेच्या जिल्हा अध्यक्षाच्या सदऱ्यातील रकमेवरच अज्ञात चोरटयांनी डल्ला मारला. पॅन्टच्या खिशात ठेवलेली पन्नास हजार रुपयांचा बंडल हातोहात लंपास केली. भरदिवसा घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली होती. सदरचा प्रकार हा २६ मार्च रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभुते (वय ४५ … Read more

धक्कादायक !!! सकाळी व्यायामासाठी जाणाऱ्या नागरिकांना आढळून आले स्त्री जातीचे बाळ

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे तासगाव तालुक्यातील बलगवडे येथे बलगवडे ते भिवघाट रस्त्या कडेला साधारणपणे ५ ते ६ महिने वय असणारे स्त्री जातीचे बाळ पहाटे व्यायामासाठी जाणाऱ्या नागरिकांना ६ वाजता आढळून आले. सदर बाळ सुखरूप असून त्याला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या बाबत तासगाव पोलिसात नोंद झाली आहे. घटनास्थळी स्त्री जातींचे अर्भक … Read more

घरात घुसून चाकूचा धाक दाखवत लुटले, तातडीने कारवाई करत पोलिसांकडून एकास अटक

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे शिराळा तालुक्यातील चरण येथील दुर्गा हॉटेलचे मालक संजय पुजारी यांच्या घरात घुसून अज्ञात चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून, अंगावरील सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटली. यानंतर तेथून पोबारा करताना बीऊर येथे नाकाबंदी करणाऱ्या शिराळा पोलिसांच्या पथकाला यातील एक आरोपी हाती लागला तर उर्वरित दोन आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून गेले. या … Read more

धक्कादायक !!! सोनपापडी देण्याचे अमिष दाखवत पाथरीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

हॅलो महाराष्ट्र | परभणी प्रतिनिधी जिल्ह्यातील पाथरी शहरामध्ये बाल लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली असून सोनपापडी खाण्यास देण्याचे अमिष दाखवत एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. दरम्यान याप्रकरणातील आरोपीच्या पाथरी पोलिसांनी काही वेळातच मुसक्या आवळल्या असून त्याच्याविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाथरी शहरामध्ये धक्कादायक आणि मानवी समाजाने शरमेने मान खाली … Read more