पोलीस असल्याचे सांगून वृद्धेला लुटले, 3 लाख 50 हजारांचे दागिने चोरट्यांकडून लंपास

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे पोलीस असल्याची बतावणी करीत जत शहरातील मंगळवार बाजार पेठेत राहणार्या श्रीमती सूरजदेवी मिश्रीमल ओसवाल यांच्या अंगावरील साडेसहा तोळ्याचे तीन लाख पन्नास हजार किमतीचे दागिने हातोहात लंपास करण्याची घटना आज सकाळी ९ वाजता घडली. या दिवसा ढवळ्या चोरीत तिघा अज्ञात चोरट्यांनी अत्यंत विश्वासाने या वृध्द महिलेच्या अंगावरील दागिने लंपास केल्याने खळबळ … Read more

शाळकरी मुलाचा जेसीबीखाली सापडून मृत्यू,चालकाला पोलिसांकडून अटक

सांगली प्रतिनिधी I प्रथमेश गोंधळे इस्लामपूर-वाघवाडी फाटा मार्गावरील अभियंतानगर येथे सिमेंट रस्त्यांवर झोपलेल्या हर्षवर्धन नागनाथ पाथरवट या शाळकरी मुलाचा पहाटे जेसीबीखाली सापडून मृत्यू झाला. अपघात की घातपात याबाबत घटनास्थळावर उलटसुलट चर्चा होती. याप्रकरणी जीसीबी चालक जयमगंल बैजनाथ सिंह याला अटक करण्यात आली. पोलिसांनी अपघातातील जेसीबी ताब्यात घेतला आहे. दगड काम करणार्‍या पाथरवट कुटुंबातील जीत बाढाईत, … Read more

सख्ख्या भावाच्याच घरावर डल्ला मारणाऱ्या भावाला पोलिसांनी केले जेरबंद

सांगली प्रतिनिधी I प्रथमेश गोंधळे वाळवा तालुक्यातील चिकुर्डे जवळ असणाऱ्या माळवाडी परिसरातील घरात कोणी नसल्याचे पाहून सख्ख्या भावानेच घराचा दरवाजा व कडी कोयंडा लोखंडी टॉमीने उचकटून घरातील 1 लाख 88 हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी जावेद बादशाह तांबोळी याला कुरळप पोलिसांनी अटक केली आहे. चिकुर्डे येथील सलीम तांबोळी हे कुटुंबियांसमवेत परगावी गेले होते. … Read more

धक्कादायक !!! वाळू तस्करी रोखण्यासाठी गस्त घालत असलेल्या तहसीलदारांच्या गाडीवर घातला डंपर

सांगली प्रतिनिधी I प्रथमेश गोंधळे वाळू तस्करी रोखण्यासाठी गस्त घालत असलेल्या तहसीलदार बाई माने यांच्या पथकाच्या गाडीवर सोमवारी पहाटे डंपर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. तहसीलदार माने वाळू तस्करी रोखण्यासाठी तलाठी अमीर मुल्ला, कोतवाल गोरख जावीर,संजय माने यांच्या पथकासह गस्त घालत होत्या. आटपाडी- निंबवडे रस्त्यावर आबानगर … Read more

दुकानावर छापा टाकून बेकायदेशीर रित्या साठवलेला 88 हजारांचा गुटखा पोलिसांकडून जप्त

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे शिराळा तालुक्यातील चरण येथे एका दुकानात विक्रीस प्रतिबंध असलेला, बेकायदेशीर रित्या साठवून ठेवलेला गुटख्याचा साठा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जप्त केला. या प्रकरणी लक्ष्मण आनंदा डुबल यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या दुकानातून विमल, माणीकचंद गुटखा आणि सुगंधी तंबाखू असा एकूण ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक … Read more

सोशल मीडियावरील चॅटींगवरून दोन गटात झालेल्या हाणामारीत दोघांचा मृत्यू

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे जत तालुक्यातल्या उमदी येथे सोशल मीडियावर चॅटींग केल्याचे राग मनात धरून दोन गटात झालेल्या तुफान हाणामारीत दोन तरुणांचा निर्घृण खून झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये एक तरुण गंभीर जखमी असून त्या तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. त्यास सोलापुर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी तरुणाला दाखल केले आहे. गुंडु उर्फ मदगोंडा नागाप्पा बगली, संतोष … Read more

मंगळवेढा येथील खुनाचा सांगली पोलिसांकडून उलगडा, प्रेयसीच्या सांगण्यावरून तिच्या पतीचा तिघांनी केला होता खून

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे प्रेयसीच्या सांगण्यावरून तिच्या पतीचा प्रियकराने साथीदारांच्या मदतीने खून केल्याची घटना मंगळवेढा तालुक्यातील शिवणगी गावामध्ये घडली होती. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आत्महत्येचा बनाव केला होता. या प्रकरणी सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तिघांना सापळा रचून अटक केली. प्रशांत अशोक पवार, शाहरुख रफिक शेख आणि अजय परशुराम घाडगे अशी अटक … Read more

शेतीच्या बांधावरून झालेल्या वादात शेतकऱ्यांना बेदम मारहाण

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील राजेवाडी येथे शेतीच्या बांधावरून दोघा शेतकऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे. हा मारहाणीचा व्हिडीओ कॅमेरात कैद झाला आहे तर आटपाडी पोलीस ठाण्यात सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेवाडी मध्ये धोंडीराम शिरकांडे याची 40 एकर जमीन आहे. त्याच्याच बाजूला संदीप शिरकांडे यांची जमीन आहे. या … Read more

विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांकडून तीन लाखांची दारू जप्त

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे विजापूर गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर पाच्छापुर फाट्याजवळ आज सकाळी जत पोलिसांनी अचानक टाकलेल्या धाडीत विदेशी गोवा मेड कंपनीची दारूसह तीन लाख २४ हजार माल जप्त केला. याप्रकरणी एका अज्ञात सह तिघं जणा विरूध्द जत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सांगली जिल्हा प्रमुख दीक्षित गेडाम व उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले … Read more

मिरजेत गावठी पिस्तूल व जीवंत काडतुसांसह एकास अटक, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे मिरजेतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ रात्री दीड वाजण्याच्या सुमारास गणेश मोहन केंगार हा गावठी पिस्तुल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गांधी चौकी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी छापा टाकून त्याच्याकडून गावठी पिस्तुल, जीवंत काडतुसे, व मोटरसायकल असा एकूण 1 लाख 34 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असून केंगार याच्या विरोधात गांधी चौकी पोलिसात गुन्हा … Read more