उस्मानाबामध्ये ४० रुपयाचे बिल न दिल्याने खून

उस्मानाबाद प्रतिनिधी | माणसाचे जीवन अमूल्य असते त्याची किंमत कशानेच मोजता येऊ शकत नाही असे बोलले जात असले तरी देखील नेमक्या त्या जीवनाची किंमत समजलेलीच नसते. अगदी किरकोळ कारणावरून एखाद्याचा जीव घेतला जात असेल तर आपण खर्च माणसे आहोत की जनावरे आहोत असा प्रश्न उपस्थित होतो. जनावरांना देखील दया-माया असते ते देखील किती भावनिक असू शकतात … Read more

तिसरीच्या मुलीवर दारू पाजून लैंगिक अत्याचार प्रकरणी नराधम वृद्धास शिक्षा

सांगली प्रतिनिधी | इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला दारू पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस अतिरिक्त सत्र न्यायाधीश उज्वला नंदेश्वर यांनी १८ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.काका रामू पवार असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. हा गुन्हा तासगाव तालुक्यातील नरसेवाडी येथे १६ ऑगस्ट २०१४ रोजी घडला होता. पीडित मुलगी तिसरीत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत होती. … Read more

प्रेयसीच्या त्रासाने इसमाची गळफास घेवून आत्महत्या

बुलढाणा प्रतिनिधी | प्रेयसी आणि तिच्या नातेवाईकांकडून ब्लॅकमेलिंग केलं जात असल्यामुळं त्यांच्या त्रासाला कंटाळून एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी समोर आली. याप्रकरणी प्रेयसी आणि तिला मदत करणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केली आहे. विष्णू श्रावण जाधव अस आत्महत्या करणाऱ्या इसमाच नाव आहे. विष्णू हा चटई बनवण्याच काम करत होता. त्याच्या प्रेयसीने त्याला लग्नासाठी गळ … Read more

कृष्णा नदीपात्रात उडी टाकून महिलेची आत्महत्या

कराड प्रतिनिधी | कराड येथील पुलावरून महिलेने कृष्णा नदीपात्रात उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास घडली. सुनंदा प्रकाश माने (वय 48) रा. विंग ता. कराड असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास चालू आहे. या प्रकाराने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांकडून … Read more

गुन्हे शाखेच्या कारवाईत ६ लाखांच्या दारूसह दोघांना अटक

चंद्रपूर प्रतिनिधी | नागपुराहुन चंद्रपूर येथे आणत असलेला ६ लाख रुपये किमतीचा दारूसाठा पोलिसांनी जप्त केला. प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह चौकात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे. यात स्कार्पिओ वाहनासह दोघांना अटक करण्यात आलीआहे. एका स्कार्पिओ वाहनातून मोठा दारूसाठा चंद्रपुरात येत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक … Read more

चोरटयांनी पोलिसांच्या अंगावर घातली जीप

कल्याण प्रतिनिधी | कल्याणमधील संतोषी माता रस्त्यावर शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी पोलिसांच्या अंगावर जीप घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात डीसीपी स्कॉडचा एक पोलिस जवान गंभीर जखमी झाला आहे. या घटनेबाबत सविस्तर माहितीनुसार, कल्याणमधील संतोषी माता रस्त्यावर शुक्रवारी मध्यरात्री बँकेत चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांना पोलिसांनी हटकल असता, आरोपींनी महिंद्रा जीप पोलिसांच्या … Read more

पोलीस अधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

प्रतिनिधी रायगड |अलिबाग येथे तीन महिन्यांपूर्वी बदलीवर आलेल्या सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कणेरकर (50) यांनी पोलीस मुख्यालयात अधीकारी विश्रामगृहामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खलबळजनक घटना घडली आहे. या घटनेने जिल्हा पोलिस दल हादरून गेले आहे. मात्र प्रशांत कणेरकर यांनी आत्महत्या का केली? याबाबत स्पष्ट कारण कळलेले नाही. प्रशांत कणेरकर यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात … Read more

पुणे : आईनेच केले तीन लहान मुलांचे हत्याकांड ; भोसरी परिसरातील घटना

पुणे प्रतिनिधी | जन्म देणार आईच मुलांचा जगण्याचा हक्क हिरवणारी ठरल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील भोसरी परिसरात आईने तीन मुलांना गळपास लावून स्वतः आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने भोसरी परिसरात खळबळ माजली असून मयत लहान मुलांप्रती हळहळ व्यक्त केली जात आहे. अल्फीया बागवान (९), जोबा बागवान (७), जिआन बागवान (६) अशी मयत … Read more

अहमदनगरमध्ये आणखी एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

अहमदनगर प्रतिनिधी | अहमदनगर येथे सेक्स रॅकेटचे मोहोळ दाटले आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे. कारण मागेच औरंगाबादरोडवर सुरू असणाऱ्या सेक्स रॅकेटचा पडदा फाश करायला गेलेल्या पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना ताजी असतानाच अहमदनगर मध्ये आणखी एक सेक्स रॅकेट उघडकीस आले आहे. अहमदनगर मधील गांधी मैदानाशेजारी असणाऱ्या भगत गल्लीत सेक्स रॅकेट सुरु असल्याची वार्ता पोलीस … Read more

मंगलदास बांदल यांच्यावर मोक्का लागण्याची शक्यता ; थेट होऊ शकते तुरुंगात रवानगी

पुणे प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नव्याने नियुक्त झालेले मंगलदास बांदल यांच्यावर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची वक्र दृष्टी पडली आहे. ते सध्या रांजणगाव औद्योगिक पट्ट्यात उद्योगपतींच्या भेटी गाठी घेऊन त्यांच्या समस्या समजून घेत आहेत. त्याच्या या कृतीची त्यांना आवश्यकता का पडली तर त्याचे कारण हे की मंगलदास बांदल यांच्यावर दाखल झालेले गुन्हे. … Read more