पोलीस ठाण्यात वकीलास लाथा-बुक्यानी मारहाण

पाथरी पोलीस ठाण्यातील धक्कादायक प्रकार परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे पोलीस ठाण्यात शुल्लक कारणावरुन कायदा रक्षकानेच कायदा हातात घेत चक्क वकीलास लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडलीय. पाथरी तालुक्यातील लोणी येथिल एका प्रकरणाची फिर्याद देण्यासाठी एका पीडीतासोबत पाथरी न्यायालयामध्ये पेशाने वकिल असणारे अॅड.उत्तम डोंगरे पाथरी पोलीस ठाण्यात गेले असता त्यांनी ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना लोणी … Read more

शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या चारा छावणीतील भ्रष्टाचार उघड

Untitled design

बीड प्रतिनिधी |बीड जिल्हा शिवसेना प्रमुखाच्या चारा छावणीत बोगस जनावरे दाखवून सरकारी मदत लुटण्याचा प्रकार घडत असल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. शिवसेनेचा जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या छावणीत ८०० जनावरे बोगस दाखवून त्यांच्या नावे सरकारी मदत उखळली जात होती. प्रशासनाने या प्रकरणी चारा छावणीला भेट देऊन शिवसेनेचा जिल्हाप्रमुखाचे पितळ उघडे पडले आहे. ‘या’ मतदारसंघात शिवसेनेचा … Read more

दोन गटात वाद ; १३ जणाच्याविरोधात पोलीसात गुन्हा दाखल

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे, खानापूर तालुक्यातील कुर्ली येथील दोन गटांत जोरदार राडा झाला. याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी विटा पोलिस ठाण्यात फिर्यादी दिल्या आहेत. याप्रकरणी दोन्ही गटांतील १३ जणांविरूध्द विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी लक्ष्मण शिंदे आणि सुरज कुंभार यांनी परस्परविरोधी फिर्यादी दिल्या आहेत.  या राड्याप्रकरणी एका गटातील सुरज कुंभार, अमित उर्फ … Read more

मुंबई : ५५ वर्षीय डॉक्टरने केला २१ वर्षीय मॉडेलवर बलात्कार

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | येथील ५५ वर्षीय डॉक्टरने २१ वर्षीय मॉडेलवर बलात्कार केल्याने मुंबई शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीसांनी या डॉक्टरला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. या प्रकरणातील पिडीत तरुणी एका मालिकेसाठी काम करत होती. त्वचा रोगाची समस्या जाणवू लागल्याने तिने एका स्कीन डॉक्टर बद्दल विचारणा केली. तेव्हा तीच्या मित्राने आरोपी डॉक्टर सोबत … Read more

पुण्यात चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा ‘पर्दाफाश’

Untitled design

पुणे प्रतिनिधी |पुण्यात दापोडी आणि भोसरी भागातसुरु असणाऱ्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी ‘पर्दाफाश’ केला आहे. सापळा लावून आरोपींना जाळ्यात पकडून पोलिसांनी तीन मुलींची  देह विक्रीच्या व्यवसायातून सुटका केली आहे. सदरची कार्यवाही मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास केली असल्याची माहिती  पोलिसांनी माध्यमांना दिली. या सेक्स रॅकेट प्रकरणात पोलीसांनी रेणू रमेश भाटिया (६३, रा. दापोडी), पेपसिंह शेतानसिंह (२५, रा. दापोडी, … Read more

महिला सरपंचाला पुरुषांकडून भर ग्रामसभेत मारहाण

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे , शिराळा तालुक्यातील कांदे गावामध्ये महाराष्ट्र दिनीच महिला सरपंचाला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सरपंच सुवर्णा बाळासाहेब पाटील यांना कामगार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत मारहाण करण्यात आली. या प्रकरणी सुवर्णा पाटील यांनी शिराळा पोलीस ठाण्यात चौघांविरोधात फिर्याद दिली असून फिर्यादीनुसार चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान … Read more

धक्कादायक! पोलीसांच्या हाप्त्याला कंटाळून तरुणाची आत्महत्या

Untitled design

उल्हासनगर प्रतिनिधी |पोलिसांच्या त्रासाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उल्लासनगर येथे उघडकीस आला आहे. हप्ता मागत असलेल्या पोलीसांचा त्रास सहन होत नसल्याने तरुणाने गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. सतीश खेडकर असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून तो हॉटेल चालक आहे. त्याला पोलीस हप्ता मागून सतत त्रास देत होते. त्यांच्या त्रासाला कंटाळून त्याने आपले … Read more

बंद घराचा फायदा घेवून चोरट्यांनी १५ लाखाचा ऐवज लुटला

Untitled design

कोल्हापूर प्रतिनिधी |कोल्हापूरच्या गजानन महाराजनगर इथल्या प्रतीक नरके यांचा बंगला फोडून चोरट्यांनी ३४ तोळे दागिने, दीड किलो चांदी, २० हजारांची रोकड आणि इलेक्ट्रानिक वस्तू असा सुमारे १५ लाखांचा ऐवज लंपास केला. मध्यरात्री हा प्रकार उघडकीला आला. बंगल्यातील सार्‍या किमती ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारल्याने नरके कुटुंबीयांना मोठा धक्‍का बसला आहे. गजबजलेल्या, मध्यमवर्गीय कॉलनीतील घटनेमुळे नागरिकांत भीतीचे … Read more

घरफोडी : दीड लाख रुपय किंमतीचा ऐवज लंपास

Untitled design

नशिक प्रतिनिधी | भिकन शेख , संपूर्ण कुटुंब रात्री घरात झोपलेले असताना तिघा चोरट्यानी घरात प्रवेश करून घरातील सोन्याचे दागिने ठेवलेली लोखंडी पेटी पळवल्याची घटना हिंगणवेढे (ता. जि. नाशिक) येथे रविवारी (दि.२८) पहाटे अडीच वाजता घडली. या घरफोडीत रमेश विनोबा धात्रक (वय ५८) यांच्या घरातील ७७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे १ लाख ५४ हजार रुपये किंमतीचे … Read more

गडचिरोली: पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक

Untitled design

गडचिरोली प्रतिनिधी |गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील शेवटचे पोलीस मदत केंद्र गट्टा अंतर्गत गुंडूर्वाही आणि पुलनार गावांच्या मधोमध असलेल्या पहाडीच्या झ-याजवळ सर्चिंग अभियानावर असलेल्या गडचिरोली पोलीस दलाच्या नक्षल विरोधी अभियान राबविणा-या सी 60 दलासोबत नक्षलवाद्यांच्या झालेल्या चकमकीत पोलीसांनी स्वत:चे कुठलेही नुकसान होऊ न देता दोन नक्षल्यांचा खात्मा केलाय. आज दुपारी 12.30 ते 1 च्या सुमारास जोरदार … Read more