सचिन पायलट परत आले, तर मी त्यांना मिठी मारेन,पण.. – अशोक गेहलोत

जयपूर । काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्या बंडखोरीनंतर राजस्थानातील अशोक गेहलोत सरकारवर राजकीय संकट अजून कायम आहे. एकीकडे पायलट यांच्यावर अन्याय झाल्याचे सूत्रांच्या हवाल्याने बातम्या येत असताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत प्रसारमाध्यांसमोर येऊन आपलं सरकार पडण्यामागे पायलट कसे सक्रिय होते याबाबत सांगत आहेत. दरम्यान, एका वृत्तवाहिनीशी बोलताना मागच्या दीड वर्षांपासून आमच्यात कुठलाही संवाद नाहीय” असे मुख्यमंत्री … Read more

सचिन पायलटांना हायकोर्टाचा मोठा दिलासा; अपात्रतेचीच कारवाई २१जुलैपर्यंत टळली

जयपूर । राजस्थानमध्ये निर्माण झालेल्या राजकीय संकटात सचिन पायलट व त्यांच्या समर्थक आमदारांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. राजस्थान विधानसभेच्या अध्यक्षांनी सचिन पायलट यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भात नोटीस बजावली होती. या नोटीसीला सचिन पायलट समर्थक आमदारांनी राजस्थान उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. दरम्यान, सचिन पायलट व इतर सदस्यत्व रद्द करण्याची नोटीस बजावलेल्या … Read more

राजस्थानात आमदार खरेदीच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे एका भाजप नेत्यासह केंद्रीय मंत्र्यावर गुन्हा दाखल

जयपूर । काँग्रेसने बंडखोर आमदार भंवरलाल शर्मा आणि भाजपचे नेते संजय जैन यांची आमदारांच्या खरेदीबाबतची चर्चा असलेली कथित ऑडिओ टेप जारी केली होती. यात केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांचा आवाज असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे. त्यानंतर राजस्थान पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत, काँग्रेसचे बंडखोर आमदार भंवरलाल शर्मा आणि भाजप नेते संजय जैन यांच्याविरोधात … Read more

‘त्या’ ऑडिओ क्लिपमुळे राजस्थानमधील राजकारणात खळबळ

जयपूर । राजस्थानमध्ये राज्य सरकारवरील अस्थिरतेचं संकट अद्यापही कायम असून रोज नाट्यमय घडामोडी घडत आहेत. याचदरम्यान एका ऑडिओ क्लिपमुळे राजस्थानमधील राजकारणात खळबळ माजली आहे.गुरुवारी एक धक्कादायक ऑडिओ क्लिप प्रसारमाध्यमांमधून समोर आली. यामध्ये केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, भाजपा नेते संजय जैन आणि काँग्रेस आमदार भवरलाल शर्मा राजस्थान सरकारमधील आमदारांसंबंधी बोलत आहेत. आमदार भवरलाल शर्मा आणि … Read more

महत्त्वाकांक्षी असण्यात काहीही गैर नाही! प्रिया दत्त यांनी केली सचिन पायलटांची पाठराखण

मुंबई । राजस्थानमध्ये सचिन पायलट यांच्या बंडानंतर काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. काँग्रेसने सचिन पायलट यांची राजस्थानच्या उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरून मंगळवारी दुपारी हकालपट्टी केली आहे. अशा वेळी इतर राज्यांमधील तरुण काँग्रेसजनांमध्ये सचिन पायलट प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्या प्रिया दत्त यांनीही या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया देत सचिन पायलट यांची पाठराखण केली आहे. … Read more

सचिन पायलट यांचं धोरण म्हणजे ‘आ बैल मुझे मार!’ अशोक गेहलोत यांची जहरी टीका

जयपूर । सचिन पायलट यांचं धोरण म्हणजे ‘आ बैल मुझे मार’ सारखं आहे. अशी टीका आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पायलट यांच्यावर केली आहे. बंडाचा झेंडा हाती घेतलेल्या सचिन पायलट यांच्यावर काँग्रेस पक्षाकडून अखेर कारवाई करण्यात आलेली असून उपमुख्यमंत्री पदावरुन त्यांना हटवण्यात आलं आहे. दरम्यान पायलट यांची भाजपासोबत डील झाली आहे. त्यामुळे आता ते … Read more

सचिन पायलट यांच्या हातात काही नाही, भाजपा सर्व खेळ खेळत आहे- मुख्यमंत्री गहलोत

जयपूर । “सचिन पायलट यांच्या हातात काहीच नाही. भाजपा सर्व खेळ खेळत आहे. भाजपाने रिसॉर्टची व्यवस्था केली असून ते सर्व काही हाताळत आहेत. मध्य प्रदेशात काम करणारी टीम येथे काम करत आहे,” असा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे. सचिन पायलट यांना राजस्थानच्या उपमुख्यमंत्री पदावरुन हटवण्याचीकारवाई करण्यात आल्यानंतर अशोक गेहलोत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद … Read more

उपमुख्यमंत्रीपदावरुन हटवल्यानंतर सचिन पायलट म्हणाले…

जयपूर । राजस्थानात बंडाचा झेंडा फडकवून अशोक गेहलोत यांचं सरकार अडचणीत आणणारे सचिन पायलट यांना काँग्रेसने उपमुख्यमंत्रीपदावरुन हटवलं आहे. काही वेळापूर्वीच काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे जाहीर केलं. त्यानंतर अवघ्या एका वाक्यात सचिन पायलट यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्रीपदावरुन हटवल्यानंतर सचिन पायलट यांनी ट्विटवर पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. … Read more