मनसे आता हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनाही हायजॅक करणार का?; शिवसेनेच्या नेत्याचा सवाल 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुण्यातील खालकर मारुती चौकात उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते महाआरती होणार आहे. या कार्यक्रमाचे पोस्टर मनसेकडून तयार करण्यात आले असून त्यावर राज यांचा उल्लेख हिंदुजननायक असा करण्यात आला आहे. यावरून आता शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “हिंदू हृदयसम्राट तथा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे … Read more

‘जनतेचे प्रश्न मांडणाऱ्यांना फसवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी पोलिसांना सुपारी दिली’; राणांचा हल्लाबोल

ravi rana uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपसह इतर पक्षातील नेत्यांकडूनही जोरदार टीका केली जात आहे. आज युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष व अमरावतीतील बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “सध्या जनतेचे प्रश्न मांडले जात आहेत. अशा प्रश्न मांडणाऱ्यांना फसवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी पोलिसांना सुपारी दिली असल्याची … Read more

रवी राणा दिसला तर गोळी घाला असे आदेश; सभागृहात गदारोळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमरावती महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावरील शाइफेक प्रकरणी भाजप आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल झाला. याचे मोठे पडसाद विधानसभेत पाहायला मिळाले. रवी राणा दिसला तर त्याला गोळ्या घाला असे आदेश देण्यात आलेत असा गंभीर आरोप त्यांनी राज्य सरकारवर केला. यानंतर सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गदारोळ माजला. मी दिल्लीत असताना माझ्यावर … Read more

…तर आम्ही पावणेपाच जणांची नावं ED ला देणार; रवी राणांचा संजय राऊतांवर पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे साडेतीन लोक जेलमध्ये जाणार असे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर आता बडनेरा चे आमदार रवी राणा यांनी संजय राऊतांवर पलटवार केला आहे, आम्हीही ईडी कडे पावणेपाच जणांची नवे देईन असं म्हणत त्यांनी राऊतांना इशारा दिला आहे ज्याप्रमाणे साडेतीन जण संजय राऊत सांगतात, तर आमच्याकडे पावणेपाच जणांनी नावे आहेत. … Read more

रवी राणांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप; म्हणाले की मला कोणत्या तरी गुन्ह्यात अडकवायच अन्…..

ravi rana uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमरावतीचे मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणी बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यासाहित ११ जणांवर कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर राजकारण पुन्हा एकदा तापलं असून रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर निशाणा साधला आहे. माझ्यावर गुन्हे दाखल करुन मला कोणत्यातरी गुन्ह्यात अडकवलं पाहिजे असा इशारा उद्धव … Read more

रवी राणा यांच्यासह 10 जणांवर गुन्हा दाखल; पालिका आयुक्त शाई फेक प्रकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अमरावतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या प्रकरणावरून अमरावती महानगर पालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रकार काल घडला आहे. या प्रकरणात आमदार रवी राणा यांच्यासह 10 जणांवर कलम 307 अंतर्गत हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावतीमध्ये असलेल्या राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता. … Read more

छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत, कुठलाही प्रकार खपवून घेतला जाणार नाही – एकनाथ शिंदे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावती येथे युवा स्वाभिमान पक्षाचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा बसवलेला पुतळा मनपा आणि पोलीस प्रशासनाने हटवला. यानंतर अमरावती येथील वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेवरून शिवसेना नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहेत. त्यांच्याबाबत कुठलाही प्रकार … Read more

छत्रपतींचा पुतळा बसविण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही; नवनीत राणांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । युवा स्वाभिमान पक्षाचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा बसवलेला पुतळा अमरावती मनपा आणि पोलीस प्रशासनाने हटवला. दरम्यान, यानंतर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. “उद्धव ठाकरे सरकार शिवप्रेमींची गळचेपी करत आहे. आताची शिवसेना ही शिवसेना नसून ती काँग्रेस सेना झाली आहे’ … Read more

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राडा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात महाविकास आघाडी सरकारवर व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी चांगलाच राडा घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाबाहेर त्यांनी कुजलेल्या सोयाबीनची होळी केली. तसेच कुजलेले सोयाबीन आणि संत्रे फेकून केला सरकारचा निषेध व्यक्त केला आहे. शासनाकडून व सरकारकडून नुकसानग्रस्त … Read more

“…तर शेतकरी उद्धव ठाकरेंनाही दिवाळी साजरी करु देणार नाही”; रवी राणांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ठाकरे सरकारच्यावतीने काल महत्वपूर्ण निर्णय घेत शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा करीत निर्णय घेण्यात आला. मात्र, हि मदत कधी दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागू राहिले आहे. अशात बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मदतीवरून इशारा दिला आहे. “शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वी जर मदत जमा दिली … Read more