‘भाजपला बहुजनांचे राजकारण संपवायचे; खडसेंनंतर मलाही ईडीची नोटीस येणार!’ ‘या’ मंत्र्याचे भाकीत

मुंबई । ‘भाजपला बहुजनांचे राजकारण संपवायचे आहे. आज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना इडीची नोटीस आली, उद्या मलाही येऊ शकते. बदल्याच्या राजकारणाचा पायंडा भाजपने पाडला आहे. मात्र, त्यांनी लक्षात ठेवावे की कोणीही सत्तेचा मुकुट घेऊन आलेला नाही. जे पेराल ते उगवेल आणि त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील,’ असा इशारा राज्याचे मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री … Read more

औरंगाबादमध्ये मंत्री विजय वडेट्टीवारांच्या बैठकीत तुफान ‘राडा’, कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की आणि बाचाबाची

औरंगाबाद । राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या औरंगाबादमधील बैठकीत जोरदार गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड येथे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की आणि बाचाबाची झाली. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, विजय वडेट्टीवार यांची औरंगाबादमध्ये बैठक सुरु असतानाच काही कार्यकर्त्यांनी नेत्यांनी समाजासाठी काय … Read more

विरोधकांनी केंद्राकडे राज्याला मदत करावी म्हणून शाई सुद्धा खर्च केली नाही- वडेट्टीवार

नागपूर । अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांना (Flood Infected Farmers) आज मदतीचा पहिला टप्पा म्हणून २ हजार २९७ कोटी वितरीत केला. याशिवाय ४ हजार ७०० कोटी आम्ही दिवाळीनंतर (Diwali 2020) देऊ असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) यांनी म्हटलंय. तसेच राज्य संकटात असताना विरोधकांनी केंद्राला मदत करावी म्हणून शाई सुद्धा खर्च केली नाही असा टोला … Read more

राज्यात सलून लवकरच सुरू होणार; मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

गडचिरोली । लॉकडाऊनमुळे राज्यात सलून व पार्लर बंद असल्याने नाभिक समाजाला बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून, लवकरच सलून व पार्लर सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याची माहिती राज्याचे ओबीसी कल्याण, भूकंप, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज गडचिरोलीमध्ये पत्रकार परिषदेत दिली. वडेट्टीवार यांनी सांगितले की, व्यवसाय बुडाल्याने … Read more