पाटण ग्रुप विकास सोसायटीत राष्ट्रवादीचा 13-0 असा विजय, देसाई गटाचा दारूण पराभव

पाटण |  संपूर्ण पाटण तालुक्याचे लक्ष लागलेल्या पाटण ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी निवडणुकीत राज्याचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलचे सर्व उमेदवार बहुमताने निवडून आले. विरोधी राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई गट पुरस्कृत शेतकरी परिवर्तन पॅनलचा 13-0 असा नामुष्कीजनक पराभव झाला. पाटण ग्रुप विविध कार्यकारी … Read more

अभयचीवाडी सोसायटीत सत्तांतर : अँड. उदयसिंह पाटील- उंडाळकर गटाचा विजय तर राष्ट्रवादीचा पराभव

कराड | अभयचीवाडी (ता. कराड) कार्यकारी विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीत शेतकरी विकास परिवर्तन पॅनलने सत्तांतर घडवले. ॲड. उदयसिंह पाटील व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाने 12/1 असा पालकमंत्री बाळासाहेब पाटील, सत्यजित पाटणकर यांना मानणाऱ्या पॅनेलचा पराभव करत सत्तांतर घडवून आणले. शेतकरी विकास परिवर्तन पॅनेलमधून यशवंत खाशाबा काटकर (140), सचिन नाथाजी जाधव (143), अनिल विठ्ठल पगडे … Read more

रंगत वाढली : म्हासुर्णे विकास सेवा सोसायटीसाठी 12 जागांसाठी 25 जण रिंगणात

पुसेसावळी | खटाव तालुक्यातील येथील म्हासुर्णे विकास सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणुक सन 2022 ते 2027 च्या निवडणूकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेमुळे चांगलीच रंगत दिसुन येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सदर सोसायटीची निवडणूक गेली 15 वर्षे झाली बिनविरोधच होत होती. पण यावर्षीची सोसायटीची निवडणूक लागल्यामुळे गावातील नेतृत्व पणाला लागल्याने सर्वांचे लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागले … Read more

चचेगाव येथे शेतकरी विकास पॅनेलचा 13- 0 ने विजय

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी चचेगाव (ता. कराड) येथील चचेगाव विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनेलने 13-0 असा विजय मिळवला. चचेगाव विकास सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत ॲड. उदयसिंह पाटील, कराड दक्षिणचे विद्यमान आ. पृथ्वीराज चव्हाण, यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनेलने चुरशीच्या झालेल्या लढतीत १३-० … Read more

75 वर्षानंतरही उंडाळकरच : इतिहासात पहिल्यांदाच झालेल्या सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा धुव्वा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या उंडाळे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत काॅंग्रेसचे सरचिटणीस ॲड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने एकहाती मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. राष्ट्रवादीचे ॲड. राजाभाऊ पाटील, जयसिंगराव पाटील यांच्या पॅनेलचा 13-0 असा धुव्वा उडाला. उंडाळे सोसायटीची 75 वर्षात पहिल्यांदाच निवडणूक झाली त्यामध्ये काॅंग्रेसच्या उंडाळकर गटाने बाजी … Read more

विरोधकांचा धुव्वा : पुसेसावळी सोसायटीवर श्री हनुमान ग्रामविकास सहकार पॅनेलचे वर्चस्व

पुसेसावळी | पुसेसावळी (ता.खटाव) विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत चंद्रकांत (दादा) कदम आणि सुर्यकांत कदम (बापु) यांच्या नेतृत्वाखालील श्री. हनुमान ग्रामविकास सहकार पॅनेलचे सर्वच्या सर्व 13 जागावर उमेदवार निवडून आले आहेत. तर विरोधी श्री. हनुमान जनशक्ती सहकार पॅनेलचा एकही जागा मिळालेली नाही. विकास सेवा सोसायटीवर चंद्रकांत पाटील व सुरेश पाटील य‍ांचे अनेक वर्षापासुन … Read more

वेचले सोसायटीवर अजिंक्य पॅनेलची बिनविरोध सत्ता

सातारा | सातारा तालुक्यातील वेचले, शिवाजीनगर गावांसाठी संयुक्त असलेल्या वेचले विकास सेवा सोसायटीवर अजिंक्य पॅनेलने बिनविरोध सत्ता प्रस्थापित केली. चेअरमनपदी प्रमोद जाधव तर व्हा. चेअरमनपदी राहुल खामकर यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वेचले सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्व 13 जागा बिनविरोध निवडून आल्या. चेअरमन जाधव, … Read more

टेंभू_सयापुर सोसायटीच्या चेअरमनपदी बब्रुवान पाटील बिनविरोध

कराड | टेंभू-सयापूर विकास सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. सोसायटी निवडणुकीचा बिगुल वाजले पासून यावेळची निवडणूक चुरशीची होणार अशी चर्चा होती. मात्र, दोन्हीकडील नेत्यांनी मेळ घालत अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणूक बिनविरोध करण्यावर शिककामोर्तब करण्यात आला. यामधे जोतीर्लिंग पॅनेलला पाच वर्षासाठी चेअरमन पदासह सहा जागा दिल्या. तर ग्रामविकास पॅनेलला सात जागा देवून … Read more

13\0 : नागठाणेत अजिंक्य ग्रामविकास पॅनेलची एकहाती सत्ता

सातारा | सातारा तालुक्यातील तसेच कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील राजकीयदृष्ट्या महत्वाची म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागठाणे येथील विकास सेवा सोसायटी नं. 1 वर अजिंक्य ग्रामविकास पॅनेलने पुन्हा एकदा सर्वच्या सर्व 13 जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळविले. नागठाणे विकास सेवा सोसायटी नं. 1 ची यंदाची पंचवार्षिक निवडणूक मोठ्या चुरशीची झाली. निवडणूक लागल्यानंतर या निवडणुकीत अजिंक्य ग्रामविकास पॅनेलला पारंपारिक … Read more

वावरहिरे विकास सोसायटीच्या चेअरमनपदी विश्वास पांढरे

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके काही दिवसापूर्वी वावरहिरे सोसायटीची निवडणूक पार पडली आणि विकास आघाडीच्या गटाला धक्का देत आमदार गटाने वावरहिरेमध्ये आपलेच वर्चस्व असल्याचे दाखवून दिले. विरोधी गटाला १३/० च्या फरकाने येताना धक्का देताना आमदार गट विजय ठरला होता. यानंतर बहुप्रतिक्षित वावरहिरे गावच्या सोसायटीच्या चेअरमन पदाची निवड बाकी होती. आता ती प्रतीक्षा संपुष्टात येऊन वावरहिरे … Read more