मुंबई । कोरोना संकटामुळे राज्यातील महाविद्यालयांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. अद्याप महाविद्यालये सुरु होण्याचीही शक्यता दिसत नाही आहे. त्यामुळे बरेच विद्यार्थी निराशेत आहेत. याला अनुसरून जनता दल (सेक्युलर) विद्यार्थी संघटनेने महाराष्ट्र राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना पत्र लिहून महाविद्यालयांची वार्षिक फी माफ करण्याची मागणी केली आहे.
महाविद्यालयांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. सर्व उद्योगधंदे बंद असल्याकारणाने अनेकांना काम नाही आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्याकडून वार्षिक फी घेऊ नये तसेच जे पेपर रद्द करण्यात आले आहेत. त्या पेपरची फी पुढील सत्रात लागू करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
जनता दल (सेक्युलर) विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संग्राम नाथाभाऊ शेवाळे यांनी ही मागणी केली आहे. मागच्या महिन्यात अंतिम वर्षातील विद्यर्थ्यांसोबत सर्वांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.