पेरलेले सोयाबीन उगवले नाही ; शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

खरीप हंगामात शेतात मोठ्या कष्टाने पेरलेले सोयाबिन पीक उगवले नसल्याने आता दुबार पेरणी कशी करावी या प्रश्नाने उद्विग्न झालेल्या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पाथरी तालुक्यातील मर्डसगाव येथे शुक्रवार २६ जून रोजी घडली आहे.

तालुक्यातील मर्डसगाव येथील तरुण शेतकरी विष्णु उद्धवराव शिंदे वय ३४ असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे.मर्डसगाव शिवारामध्ये गट क्रमांक ३० मध्ये त्यांच्या नावे तीन एकर शेती आहे .या क्षेत्रावर मागील सहा दिवसांपूर्वी त्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती. बँकेत पिक कर्ज साठी केलेली मागणी अद्याप पूर्ण झालेली नसल्यामुळे मोठ्या कष्टाने आर्थिक जमवाजमव करून केलेली सोयाबीन पीक पेरणी उगवले नसल्याने शेतकरी हा तणावामध्ये आला होता. त्यामुळेशुक्रवारी संध्याकाळी साडे दहा वाजता या शेतकऱ्याने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावत आपली जीवनयात्रा संपवण्याची पाऊल या शेतकऱ्याने उचलल्याचे गावातील शेतकऱ्यांचे म्हणने आहे. घटनेनंतर पाथरी ग्रामीण रुग्णालयांमध्ये शनिवार २७ जून रोजी सकाळी शेतकऱ्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असुन याप्रकरणी पाथरी पोलिस स्थानकामध्ये शनिवारी दुपारपर्यंत गुन्ह्य नोंदवण्याची प्रक्रिया चालू होती .दरम्यान मयत शेतकऱ्याच्या पाठीमागे पत्नी व दोन मुले असे कुटुंब आहे.

तालुक्‍यातील बहुतांश गावांमध्ये खरिपात पेरलेली सोयाबीन उगवण होत नसल्याच्या प्रकार घडत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांकडून याप्रश्नी तालुका कृषी विभागांमध्ये तक्रारही दाखल होत आहेत. अशीच तक्रार मयत शेतकऱ्याने दोन दिवसापूर्वी कृषी विभागात दिली होती. यानंतर कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी सदरील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी ही केली होती. अशी माहिती ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.