Google Play वरील ‘हे’ १७ अ‍ॅप चोरु शकतात तुमचा प्रायव्हेट डाटा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण जर Android फोन वापरत असाल तर ही बातमी आपल्यासाठी आहे. गूगल प्लेवर कथितपणे कमीतकमी 17 अ‍ॅप्स असे आहेत की जे HiddenAds नावाच्या ट्रोजन गटाचा भाग आहेत. सायबर स्पेस फर्म Avast चा असा विश्वास होता की हे अ‍ॅप्स मोठ्या लपलेल्या HiddenAds कॅम्पेनचा एक भाग आहेत जी मुख्यत्वे भारत आणि दक्षिण पूर्व आशियामधील युझर्सना लक्ष्य करतात. Avast येथील संशोधकांना हे अ‍ॅप्स गेम्सच्या रूपात असल्याचे आढळून आलेत, मात्र ते अनावश्यक अशा जाहिराती दर्शविण्यासाठी डिझाइन केलेले आहेत आणि जे युझर्सची वैयक्तिक माहितीही चोरू शकतात. संशोधकांच्या असे लक्षात आले आहे की,या ट्रोजन अ‍ॅप्समध्ये डिव्हाइसवर त्यांचे आयकॉन लपविण्याची क्षमता असते आणि वेळोवेळी त्या डिव्हाइसवर अशा जाहिराती दर्शवितात ज्यांना आपण स्किप करू शकत नाही.

आपला डेटा अशा प्रकारे चोरीला जातो
Avast च्या संशोधकांच्या टीमने सुरुवातीला ट्रोजन कुटुंबाचा भाग असलेल्या HiddenAds या ट्रोजनशी संबंधित एकूण 47 अ‍ॅप्स शोधली. मात्र , या अँटीव्हायरस कंपनीकडून रिपोर्ट मिळाल्यानंतर आता गुगलने त्यापैकी 30 अ‍ॅप्स काढून टाकल्या आहेत. Avast च्या टीमने शोधून काढलेल्या या काही ट्रोजन अ‍ॅप्स युझर्सना जाहिराती दाखवण्यासाठी ब्राउझरही उघडतात. कारण हे अ‍ॅप्लिकेशन उघडल्यानंतर एका ठराविक कालावधीनंतर त्यांचे आयकॉन लपवतात म्हणून युझर्सना त्यांच्या डिव्हाइसवर वारंवार जाहिराती दिसण्याचे कारण समजू शकत नाही. मात्र हे ट्रोजन अ‍ॅप्स डिव्हाइसच्या अ‍ॅप मॅनेजरद्वारे अनइंस्टॉल केले जाऊ शकतात, कारण ते केवळ तेथेच दिसून येतात.

Avast च्या टीमला असे आढळले की शोधलेला प्रत्येक अ‍ॅप हा वेगळ्या डेव्हलपरचा आहे, जो सामान्य ईमेल आयडी सह Google Play वर सूचीबद्ध आहे. एकंदरीत, ट्रोजन HiddenAds सह हे अ‍ॅप्स 15 दशलक्षाहून अधिक वेळा डाउनलोड केले गेले आहेत. काही सर्वाधिक डाउनलोड केलेल्या अ‍ॅप्समध्ये Skate Board – New, Find Hidden Differences, Spot Hidden Differences, Tony Shoot – NEW,  Stacking Guys यांचा समावेश आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.