सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
सांगली जिल्ह्याचा ऑरेंज झोनमध्ये समावेश झाल्यानंतर प्रशासनाकडून काही प्रमाणात शिथिलता देण्यात आल्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे आज स्पष्ट झाले. सांगली मिरज आणि जत तालुक्यातील अंकलेत मध्ये आणखी तिघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. मिरज होळीकट्टा येथील ६८ वर्षीय महिला, सांगली येथील फौजदार गल्लीतील ४० वर्षीय महिला तर अंकले येथील कोरोना बाधित ठरलेल्या रुग्णाचा सहकारीही कोरोनाबाधित झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा ११ वर पोहोचली.
जिल्ह्यातील कोरोनाबधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने ३ मेपासून काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. नोकरी उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने लोक मोठ्या प्रमाणात बाहेर येत आहेत त्यामुळे कोरण्याचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. वाळवा तालुक्यातील कामेरी येथील ९४ वर्षे आजी कोरणा मुक्त झाली होती त्यामुळे रुग्णांची संख्या कमी होण्याचे संकेत होते मात्र मंगळवारी पुन्हा जिल्ह्यात आणखी तिघे जण करीत असल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले.
सांगलीतील विजय नगर आणि महसूल कॉलनीमध्ये दोन रुग्ण सापडल्यानंतर फौजदार गल्लीतील ४० वर्षीय महिलेमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली. त्यामुळे त्या महिलेची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याशिवाय मिरज होळीकट्टा येथील ६८ वर्षीय महिले मध्येे कोरोना ची लक्षणेेे आढळून आली. त्यामुळे त्या महिलेची कोरोना चाचणी घेण्यात आली तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
मुंबईमध्ये अंकले येथील चौघेजण कामासाठी होते. चौघे जण बुधवारी चेंबूर येथून नागज फाटा येथे आले होते. या चौघांना गावकऱ्यांनी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत कॉरंटाईन केले होते. या चौघांमध्ये एकाची लक्षणे संशयास्पद लक्षणे आढळली होती. तेथे त्यांच्या स्वॅबची तपासणी केल्यानंतर त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. त्या कोरोना बाधित ठरलेल्या रुग्णाचा सहकारीही कोरोना बाधित झाला आहे.
कोरोनाबाधित रुग्ण सापडलेल्या ठिकाणी शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना तात्काळ सुरू केले असून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग चालू आहे. या ठिकाणी वैद्यकीय पथके रवाना झाली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली. सद्यस्थितीत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 11 वर पोहोचली असून मिरजेतील कोविड रुग्णालयातील आयसोलेशनमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.