मुंबईत आरोग्य सेवेचे तीन तेरा; राणे बंधूनी शेअर केले ‘हे’ दोन फोटो 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नारायण राणे यांचे दोन्ही पुत्र निलेश राणे आणि नितेश राणे यांनी सरकारच्या कारभारावर हल्लाबोल चढविला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे दोघेही चांगलेच चर्चेत आहेत. दोघेही वादालाही बळी पडत आहेत. मात्र ते सातत्याने आपल्या ट्विटर अकॉउंट वरून आघाडीसारकारविरोधात बोलत आहेत. नुकताच नितेश राणे यांनी मुंबईतील केईएम रुग्णालयातील मृतदेहांचा फोटो शेअर केला आहे तर निलेश राणे यांनी बीएमसी च्या आगरीपाडाच्या आयसोलेशन विभागात पुरविल्या जाणाऱ्या जेवणाचा फोटो शेअर केला आहे.

मुंबईच्या केईएम रुग्णालयात मुतदेह वार्डातच ठेवून इतर रुग्णांवर उपचार सुरु असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. याच पार्श्वभूमीवर आज नितेश राणे यांनी केईएम रुग्णालयातील रुग्णालयातील परिसरात दोन्ही बाजूला एका ओळीत ठेवलेल्या मृतदेहांचा फोटो शेअर केला आहे. तर निलेश राणे यांनी जेवणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. सरकार सर्व सुविधा पुरवत असल्याचे सांगत आहे तर हे काय आहे? असे काहींनी म्हंटले आहे तर काहींनी हे जेवण मुंबईचे पालकमंत्री, उपनगर पालकमंत्री आणि मुख्यमंत्री यांना पाठवून द्यावे, म्हणजे रुग्ण कोणते पंच पक्वान्न खात आहेत याचा अंदाज येईल असे म्हंटले आहे.

 

दरम्यान राज्यात राष्ट्रपती राजवट सुरु व्हावी आणि रुग्णालये लष्कराच्या ताब्यात द्यावी म्हणून नारायण राणे यांनी नुकतीच राज्यपालांची भेट घेतली आहे. राणेंचे संपूर्ण कुटुंबच सरकारवर तुटून पडल्याचे दिसून येते आहे. आता या ट्विट ना आघाडी सरकारकडून काय उत्तर दिले जाईल. हेही महत्वाचे असणार आहे. एकूणच राज्यातील सरकार या संकटकाळात उपाययोजना राबविण्यात अपयशी ठरत असल्याचे सतत दाखवून देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून येत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment