टिकटॉक सह ५९ चीनी अ‍ॅपवर बंदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि चीन च्या सीमेवर सध्या तणाव सुरु आहे. दोन्ही देशातील सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत भारताचे २० जवान शाहिद झाले आहेत. त्यानंतर देशभरात चीनविरुद्ध संताप उसळला आहे. विविध स्तरातून चीनला धडा शिकविण्यासाठीची मागणी केली जात आहे. चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. विविध मार्गानी चीनचे भारतातील उत्पन्न बंद करण्याचे मार्ग सुचविले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आता चीनच्या ५९ ऍपवर केंद्र सरकारने बंदी आणली आहे ज्यामध्ये टिकटॉक चा देखील समावेश आहे.

देशातील सर्वाधिक तरुण टिकटॉक वर आहेत. मनोरंजनाचे साधन म्हणून भारतात टिकटॉक सर्वाधिक लोकप्रिय असणारे ऍप आहे. या ऍपवर देशातील तरुण पिढी मनोरंजनात्मक व्हिडीओसह काही माहितीपूर्ण व्हिडीओ देखील बनवत असतात. मात्र याद्वारेच चीन भारतातून पैसे देखील कमवतो. गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत भारताचे सैनिक शहीद झाल्यापासून टिकटॉकवर बंदी आणण्याची तसेच चीनी बनावटीच्या वस्तूंवर आणि ऍप वर बंदी आणण्याची मागणी केली जात होती. केंद्र सरकारने आता चीनच्या ५९ ऍपवरच बंदी आणली आहे. टिकटॉक सहित युसी ब्राऊझर चा देखील त्यात समावेश आहे.

 

टिकटॉक ला पर्यायी असे काही ऍप भारतीय बनावटीचे देखील बनविण्यात आले आहेत. केंद्र सरकारचा चीनी ऍप बंद करण्याचा निर्णय सर्वात मोठा निर्णय मानला जात आहे. चीनला मात देण्यासाठीची जी मागणी होत आहे. त्या मागणीसाठी हा निर्णय महत्वपूर्ण आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.