भारताने लादलेल्या चिनी अ‍ॅप्सवरील बंदीमुळे चीन चिंतेत, कंपन्यांचे होतेय कोट्यवधींचे नुकसान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सीमेवर झालेल्या हिंसक चकमकीनंतर भारत आणि चीनमधील तणाव आता शिगेला पोहोचला आहे. अलीकडेच भारताकडून 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आलेली आहे. त्यानंतर चीन चांगलाच अस्वस्थ झाला आहे. चीनने आता हे मान्य केले आहे की, भारतात बंदी घातल्यानंतर टिकटॉकची पॅरेंट कंपनी असलेल्या बाईटडन्सला कोट्यवधी डॉलर्सचे नुकसान होऊ शकते. चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने असे ट्विट केले आहे की, गेल्या महिन्यात लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील हिंसक संघर्षानंतर भारत सरकारने चीनच्या 59 अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे, ज्यामुळे टिकटॉकची मूळ कंपनी बाईटडन्सला 6 अब्ज डॉलर्सचे नुकसान होऊ शकते.

अ‍ॅप्सवरील या बंदीमुळे भारतीय आयटी व्यावसायिकांचे नुकसान होईलः ग्लोबल टाईम्स
यापूर्वी ग्लोबल टाईम्सने ट्विटरवर इशारा दिला होता की, अ‍ॅप्सवरील या बंदीमुळे भारतीय आयटी व्यावसायिकांचे मोठे नुकसान होईल, तसेच दोन्ही देशांमधील तणावही वाढेल. चीनच्या सत्ताधारी पक्षाचे मुखपत्र असलेल्या या वृत्तपत्राने असे म्हटले आहे की, टिकटॉक आणि शेअर ईट सारख्या जागतिक अ‍ॅप्सवर बंदी आणल्याने केवळ या कंपन्यांवरच परिणाम होणार नाही तर या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या हजारो भारतीय आयटी कर्मचार्‍यांवरही त्याचा परिणाम होईल.

 

59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याच्या या निर्णयाने जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचे उल्लंघन केले
यापूर्वी चिनी दूतावासाच्या वतीने असे म्हटले जात होते की भारताचा हा निर्णय म्हणजे जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचे उल्लंघन आहे. 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याच्या भारताच्या या निर्णयाला अमेरिकेनेही पाठिंबा दर्शविला आहे. अमेरिकेने भारताच्या या कारवाईचे कौतुक केले आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ म्हणाले की,” या निर्णयामुळे भारताचे सार्वभौमत्व, अखंडता आणि राष्ट्रीय सुरक्षेला चालना मिळेल.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment