LIC सह टॉप 10 IPO मध्ये यंदा गुंतवणूकीची आहे संधी, अशा प्रकारे करा तयारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । शेअर बाजार आणि बाजारातील चांगल्या सेंटिमेंटमुळे विक्रमी पातळी गाठली गेल्याने कंपन्या (IPO) लॉन्च करण्यासाठी स्पर्धा करीत आहेत. कोरोनाव्हायरस साथीच्या आजाराने ग्रस्त कंपन्या फंड गोळा करण्यासाठी आयपीओ लॉन्च करत असतात. आतापर्यंत जानेवारीत चार आयपीओ आले आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न दिलेले आहेत. यावर्षी देशातील बहुप्रतिक्षित एलआयसीच्या आयपीओसह आणखी 9 टॉप आयपीओ लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. या आयपीओमधून गुंतवणूकदारांना चांगला नफा देखील मिळण्याची अपेक्षा आहे.

चला तर मग आपण या आयपीओ कंपन्यांबद्दलची माहिती जाणून घेयूयात…

LIC
2021 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले की, यावर्षी भारतीय जीवन विमा महामंडळाचा (LIC) आयपीओ लाँच केला जाईल. अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की,”एलआयसीचा आयपीओ 10% पर्यंत पॉलिसीधारकांसाठी राखीव राहतील. या आयपीओद्वारे 80,000 कोटी रुपये जमा करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.”

बजाज एनर्जी
कंपनीचा आयपीओ आकार अंदाजे 5,450 कोटी रुपये आहे. बजाज पॉवर व्हेंचरचे प्रमोटर्स 300 कोटी रुपयांच्या हिस्सेदारीची विक्री करतील. शिशिर बजाज, मिनाक्षी बजाज, कुशाग्र बजाज आणि अपूर्व बजाज या कंपनीचे प्रमोटर्स आहेत. बजाज एनर्जी लिमिटेड उत्तर प्रदेशातील खासगी क्षेत्रातील थर्मल उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे.

कल्याण ज्वेलर्स
कल्याण ज्वेलर्स (Kalyan Jwellers) आयपीओच्या माध्यमातून सुमारे 1,750 कोटी रुपये उभे करण्याची योजना आखत आहेत. 1000 कोटींचा नवीन इक्विटी इश्यू देण्याची तयारी सुरू आहे. मागील आर्थिक वर्षात कंपनीने 9,814 कोटी रुपयांवरून 10,181 कोटी रुपयांचे ऑपरेशन सेल्स मिळालेले आहे.

पॉलिसी बाजार
पॉलिसी बाजार (Policy Bazar) ची स्थापना 2008 साली इन्फो एज ही प्राथमिक गुंतवणूकदार होती. पॉलिसी बाजार ही भारतातील सर्वात मोठी ऑनलाईन विमा कंपनी आहे जीचा बाजारातील वाटा 90 टक्क्यांहून अधिक आहे. पॉलिसी बाजारची योजना सप्टेंबर 2021 मध्ये आयपीओच्या आधी 2 अब्ज डॉलर्सहून अधिकचे व्हॅल्यूएशन फंडिंग राउंड आणेल.

झोमॅटो
फूड डिलिव्हरी स्टार्टअप झोमॅटो (Zomato) चा आयपीओ 2021 च्या पहिल्या सहामाहीत लाँच होणे अपेक्षित आहे. आर्थिक वर्ष 2020 मध्ये झोमॅटोने उबर ईट्सचे (Uber Eats) अधिग्रहण केले. झोमॅटो 6-8 अब्ज डॉलर्सच्या स्टॉकची किंमत निश्चित करत आहे. अँट ग्रुपने एकदा झोमॅटो मध्ये 25-26% शेअर्स घेतले. विद्यमान गुंतवणूकदार टायगर ग्लोबल, कोरा इन्व्हेस्टमेंट, स्टेडव्यू, फेडेलिटी, बो वेव्ह, व्ही कॅपिटल आणि नवीन प्रायोजक ड्रॅगोनर ग्रुप देखील या फंडिंग राउंडमध्ये भाग घेतील.

बार्बेक्यू नेशन
बार्बेक्यू नेशन (Barbeque Nation) लवकरच आपला आयपीओ घेऊन येईल. आयपीओच्या माध्यमातून मार्केट रेग्युलेटर सेबीने त्यांना 1000 ते 1200 कोटी वाढवण्यास मान्यता दिली आहे. कंपनी 150 कोटींच्या प्री-आयपीओ प्लेसमेंटवर विचार करू शकते. सयाजी हॉटेल्स, सयाजी हाऊसकीपिंग सर्व्हिसेस, कयुम धनानी, रावो धनाणी आणि सुचित्रा धनानी यांनी या कंपनीला प्रमोट केले आहे. यासाठी खासगी इक्विटी कंपनी सीएक्स पार्टनर्सकडून फंडिंग केला जातो.

डिलिव्हरी
ई-लॉजिस्टिक्स सर्व्हिस प्रोव्हाईडर डिलिव्हरी (Delhivery) ची मार्केट कॅप 20 टक्क्यांहून अधिक आहे. कंपनीने विविध फंडिंग राउंडमध्ये 780 मिलियन जमा केले आहेत. कंपनीकडे 85 हून अधिक सप्लाय सेंटर्स आहेत आणि त्यांनी आत्तापर्यंत 750 मिलियन ऑर्डर्स पुरवल्या आहेत.

पेटीएम
2010 मध्ये सेट केलेला पेटीएम (Paytm) यावर्षी आपला आयपीओ लाँच करू शकेल. सॉफ्टबँक, अँट फायनान्शियल, टी रोई प्राइस आणि डिस्कवरी कॅपिटल हे मुख्य गुंतवणूकदार आहेत. 40% भागभांडवल असलेल्या अँट फायनान्शियल या फर्ममधील सर्वात मोठे गुंतवणूकदार आहेत. कंपनीचे दैनंदिन 15 ते 20 कोटी युझर्स आहेत. यूपीआय-आधारित मोबाईल पेमेंट्स पुढील पाच वर्षांत 60% पेक्षा अधिक वाढण्याची अपेक्षा आहे.

ओला
ओला (OLA) एक प्रमुख टॅक्सी सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. यात टायगर ग्लोबल तसेच चिनी कंपनी टेंन्सेंट (Tencent) कडून फंडिंग मिळत आहे. सध्या, कंपनी वार्षिक 10 कोटींहून अधिक राइड चालवते. भारतीय बाजारातील याचा वाटा 55% आहे.

बायजूस
बायजूस (BYJUs) हा भारतातील प्रमुख ई लिर्निंग प्लॅटफार्म आहे. साथीच्या काळात यामध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. Lightspeed आणि Sequoia यांनी त्यात गुंतवणूक केली आहे. फंडाच्या आधारे याचे व्हॅल्यूएशन 10.8 अब्ज डॉलर्स आहे. कंपनीकडे 7 कोटींपेक्षा जास्त रिजस्टर्ड यूझर आहेत. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांत BYJUs ची लिस्टिंग होऊ शकते.

आयपीओ म्हणजे काय?
इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) च्या माध्यमातून कंपनी पब्लिक लिमिटेड कंपनी बनते. पहिले, बाजारात लिस्टिंग करून, गुंतवणूकदारांकडून सार्वजनिकपणे पैसे जमा केले जातात.

IPO साठी अर्ज कसा करावा?
आजकाल ऑनलाइन रजिस्ट्रेशनमुळे आयपीओसाठी रजिस्ट्रेशन करणे खूप सोपे झाले आहे. बहुतेक नॅशनलाइज्ड बँका आणि स्टॉकब्रोकर्स ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे यासाठीची सुविधा देतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आयपीओ सर्व्हिस देणार्‍या ब्रोकरिंग संस्थेकडे गुंतवणूकदारास डिमॅट खाते उघडावे लागते.

यावर्षी आयपीओ लाँच होण्याचे कारण
बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सध्याच्या बाजाराची भक्कम स्थिती पाहता कंपन्यांना त्याचा फायदा घ्यायचा आहे. परदेशी गुंतवणूकीचा फ्लो देखील सतत वाढतो आहे. आयपीओद्वारे फंड जमा करण्याची योजना सुलभ होईल, अशी कंपन्यांना आशा आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.