भविष्यात शिवसैनिकाला पंतप्रधान बनवणार – उद्धव ठाकरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । आज शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा साधेपणाने साजरा करण्यात आला. भविष्यातील देशाचा पंतप्रधान शिवसैनिक असेल असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमा ठाकरे बोलत होते. मुख्यमंत्री ठाकरे यांनी वर्धापन दिनानिमित्त पदाधिकाऱ्यांच्या व्हिडीओ कॉन्फेरंसिंगमध्ये शिवसैनिकांना आज मार्गदर्शन केले.

यावेळी आपली वाटचाल योग्य दिशेने सुरु असून एक दिवस या देशाचा पंतप्रधान शिवसैनिक असेल असं मत ठाकरे यांनी व्यक्त केले. पक्षाने आत्तापर्यंत अनेक चढउतार पहिले. पुढेही पाहावे लागतील. मात्र पंतप्रधानपदी एकदिवस शिवसैनिक नक्की असेल. त्यासाठी जे धोरण गरजेचे आहे ते मी आखले आहे. असंही ठाकरे यांनी यावेळी सांगितले. कोरोना संकटामुळे शिवसेनेचा यंदाचा वर्धापन दिन अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही उद्धव ठाकरेंकडे आम्ही उद्याचे देशाचे पंतप्रधान म्हणून पाहतोय. आता राज्याच्या सीमा ओलांडण्याची वेळ आली आहे. आता देशाचं नेतृत्व करण्याची वेळ आली आहे, असं वक्तव्य केलं आहे.

 

दरम्यान, राज्यात तब्बल २५ वर्षांनंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे आणि खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या पदावर विराजमान असले तरी कोरोना संकटामुळे यावर्षी शिवसेनेच्या वर्धापन दिनाचा जल्लोष नसेल. त्याऐवजी शिवसैनिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी  तळागाळात प्रयत्न करावेत, असं आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment