भारतापाठोपाठ आता ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतही टिकटॉकसहित अनेक चिनी अ‍ॅप्स वर बंदी ? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताकडून मागील आठवड्यात 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आल्यानंतर आता अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया देखील राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत टिकटॉकसह अनेक चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याची तयारी करत आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये संसदीय समिती लवकरच त्यावर शिक्कामोर्तब करू शकते तर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ यांनीही म्हटले आहे की,’ सुरक्षेच्या दृष्टीने अनेक चिनी अ‍ॅप्सवर लवकरच बंदी घातली जाऊ शकते.’

सुरक्षेच्या कारणास्तव भारताने टिक टॉक, यूसी ब्राउझर सारख्या 59 चिनी अ‍ॅपवर बंदी घातली आहे. आता राष्ट्रीय सुरक्षा आणि युझर्सच्या डेटाची सुरक्षितता पाहता ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका देखील टिक टॉकवर बंदी घालू शकतात. ऑस्ट्रेलियामध्ये 1.6 दशलक्षाहूनही अधिक लोक टिक टॉकचा वापर करतात. ऑस्ट्रेलियन सिनेटचे सदस्य असलेले जेनी मॅकएलिस्टर म्हणाले की, टिक टॉक कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तपासात सहकार्य करावे.

त्याच वेळी, ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटेजिक पॉलिसी इन्स्टिट्यूटचे तज्ज्ञ फर्गस रायन म्हणाले की, टिकटॉक पूर्णपणे प्रचार आणि जनतेवर पाळत ठेवण्यासाठी आहे. यात चीनच्या विरोधात दिलेल्या कल्पनांवर सेन्सॉर करण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलियाचे लिबरल खासदार तसेच गुप्तचर आणि सुरक्षा समितीचे अध्यक्ष अँड्र्यू हॅस्टी यांनी असा दावा केला होता की हे अ‍ॅप्स राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक आहे. ते म्हणाले की, ‘चीनच्या इंटेलिजेंस अ‍ॅक्ट 2017 नुसार चिनी सरकार कंपन्यांना कधीही माहिती शेअर करण्यास सांगू शकते.

अमेरिकेतही बंदी असेल
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ यांनीही सोमवारी सांगितले की, अमेरिकेमध्ये लवकरच टिकटॉक सह अनेक चिनी सोशल मीडिया अ‍ॅप्सवर बंदी घातली जाऊ शकते. फॉक्स न्यूजशी बोलताना ते म्हणाले की,’ आम्ही यावर गंभीरपणे विचार करीत आहोत आणि लवकरच याबाबत एक मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो.

पोम्पीओ म्हणाले की,’ भारताप्रमाणेच अमेरिकेनेही चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालावी आणि त्याची सुरुवात ही टिकटॉक केली पाहिजे’. ते पुढे म्हणाले की,’आम्हाला चिनी लोक आणि कंपन्यांचा सन्मान करायचा आहे, परंतु राष्ट्रीय सुरक्षेबाबत आम्ही तडजोड करू शकत नाही. अमेरिकन लोकांनी हे अ‍ॅप्स फक्त तेव्हाच वापरले पाहिजे जेव्हा त्यांना त्यांची वैयक्तिक माहिती चिनी कंपन्यांकडे जात आहे यावर त्यांना काहीच हरकत नसेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.