वारीचे सांस्कृतिक महत्व काय? जाणुन घ्या ‘या’ काही विशेष गोष्टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची संपन्न परंपरा आहे. संतांचा इतिहास आहे. पंढरपूरच्या विठुरायाला आपला परमेश्वर मानून त्याच्या भेटीच्या ओढीने त्याचे भक्त पायी पंढरपूरला जात असतात. या वारीचे वैशिष्ठ्य म्हणजे इथे लहानथोर, उच्च नीच असा काहीच प्रकार पाहायला मिळत नाही. सारेच भजन, कीर्तनात डांग होऊन आपल्या विठुरायाला भेटायला पायी जात असतात. साधारण १३ व्या शतकात सुरु झालेली ही वारकरी चळवळ म्हणजे धार्मिक चळवळीतील एक महत्वाचा टप्पा ठरली आहे. कारण जात धर्म यापलीकडे जाऊन सर्वांना सामावून घेणारी ही परंपरा आहे. यंदा कोरोनामुळे असलेल्या संचारबंदीमुळे भाविकांना प्रत्यक्ष वारीला जाता येणार नाही आहे. मात्र विविध माध्यमांवर ऑनलाईन वारीची अनुभूती घेता येणार आहे.

महाराष्ट्रातील सामाजिक चळवळींपैकी महत्वाची चळवळ म्हणजे वारकरी चळवळ होय. किंबहुना सामाजिक चळवळींचा पाया वारकरी चळवळीने घातला. या चळवळीतले डॉ महत्वाचे संत म्हणजे संत ज्ञानदेव आणि संत नामदेव हे होत. तथाकथित उच्च आणि क्षुद्र अशा दोन वेगवेगळ्या जातीतले हे संत आपापल्या सोबत झालेल्या अन्यायाविरुद्ध उभे राहिले आणि सोबतच इतरांनाही तशी शिकवण दिली. संत ज्ञानदेवांच्या वडिलांनी संन्यास घेऊन पुन्हा गृहस्थाश्रम घेतला म्हणून त्या भावंडाना वाळीत टाकण्यात आले होते. तर नामदेवाना शिक्षणाचा अधिकार नव्हता. नामदेवांनी स्वयंध्ययन करून साक्षर होण्यास सांगितले. स्वतःसोबत इतर संतानाही साक्षर होऊन ज्ञानप्रसार करण्यास प्रवृत्त केले. जेणेकरून जातीधर्मावरून शिक्षण अधिकार या प्रथेला फाटा देत सर्वाना शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले.

The Story of Panduranga Vitthal and Pundalik, Pandharpur's Divinity

संतांनी देव हा कोणत्या विधीमुळे किंवा थोतांडामुळे प्रसन्न होत नाही तर तो केवळ नामस्मरणाने प्रसन्न होतो असे सांगितले. देव आणि भाविक यांच्यामधील अंतर मिटविण्याचे काम वारकरी संप्रदायाने केले. विठ्ठलाच्या भेटीसाठी पायी येणाऱ्या भाविकांमध्ये जात धर्म बघितला गेला नाही. सर्वच जण विठ्ठलाच्या भक्तीत रममाण होऊन गेले म्हणूनच धार्मिक क्षेत्रात स्वातंत्र्य मिळवून देण्याचे काम वारीने केले असे म्हंटले जाते. सर्व जाती धर्माचे संत एकवटण्याचे काम नामदेवांनी साक्षरतेतून केले. देव अप्राप्य गोष्ट नाही हे सांगत तुम्ही त्याचे नामस्मरण करून आपले काम प्रामाणिक पणे केल्यास देव आपल्या भेटीला येतो असा संदेश संतांनी दिला. म्हणूनच वारीला सर्वधर्म समभावाची शिकवण देणारी वारी असे म्हंटले जाते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.