चायनीज अ‍ॅपच्या बंदीनंतर काय आहे सोशल मीडियाचा ट्रेंड?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारतीयांचा रोष उसळला आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी चीन ऍपच्या माध्यमातून भारतीय नागरिकांची माहिती इतर देशांना देत असल्याची माहिती दिल्यानंतर सरकारने काल चीनच्या ५९ ऍपवर बंदी घातली आहे. यामध्ये TikTok, UC Browser यासारखी ऍप देखील आहेत. यावरून ट्विटरवर व्होकल फॉर लोकल अंतर्गत अनेक ट्रेंड सुरु आहेत. त्या ट्रेंडबद्दल थोडक्यात माहिती देत आहोत.

#IndiasNo1VideoAppRoposo
हा फार वेगात सुरु असणारा ट्रेंड आहे. हा टिकटॉकसारखेच व्हिडीओ ऍप आहे. ३० जून पर्यंत ५० दशलक्ष लोकांनी हे ऍप डाऊनलोड केल्याचे दाखवले जात आहे. हे कितपत सत्य आहे हे नक्की सांगता येणार नाही मात्र अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

#RIPTiktok
सतत हे पोस्ट केले जात आहे. अनेकांनी सोशल मीडियावर काही मिम्स तयार करून या हॅशटॅगने पोस्ट केले आहेत. सोबतच टिकटॉक ने केले पीएम केअर फंडात ३० कोटी रुपयांचे असेही म्हंटले जात आहे. तर काही युजर्स ती रक्कम परत दिली पाहिजे असेही म्हणत आहेत.

पेटीएम
याच्याशी संबंधित दोन प्रकारचे ट्रेंड सुरु आहेत. एका ट्रेंडनुसार पेटीएम बंद करण्याची मागणी होते आहे. जो #UninstallPaytm म्हणून राबविला जातो आहे. यामध्ये अलीबाबा आणि त्यांची होल्डिंग कंपनी यांचा मोठा आर्थिक वाटा असून त्यातील ४०% वाटा अलीबाबाचा असल्याचे म्हंटले जात आहे. तर दुसऱ्या ट्रेंडमध्ये टिकटॉक भारतीय असल्याचे म्हंटले जात आहे. जो #PaytmIsIndian असा राबविला जातो आहे. यामध्ये पेटीएम भारतीय असून याचे संस्थापक भारतीय असून हे भारतात काम करते असे सांगितले जात आहे. हे आरबीआय च्या नियमानुसार काम करत असून याचा ६०% वाटा भारतातच राहतो असेही म्हंटले जात आहे. त्यासोबतच पीएम केअर फंडात पेटीएमने ५०० कोटी रुपयांची मदत दिल्याचेही म्हंटले जात आहे.

#Mobikwik
मोबिक्विक च्या समर्थनार्थ ट्विटरवर मोहीम राबविली जात आहे. हे देशी ऍप असून याचे समर्थन हेच व्होकल फॉर लोकल असेल असे म्हंटले जात आहे. या कंपनीने स्वतःच्या इंट्रोमध्ये तसेच बॅकग्राऊंड मध्येही ते भारतीय असल्याचा दावा केला आहे. असे बहुविध ट्रेंड सध्या ट्विटरवर चर्चेत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment