भाजप-सेना पुन्हा युती होणार का? मुख्यमंत्र्यांनी दिले ठाकरे स्टाईलमध्ये रोखठोख उत्तर

Uddhav Thackery
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीमुळे भाजप आणि शिवसेना यांच्या युतीची चर्चा पुन्हा जोर धरू लागली. पण, आज स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या ठाकरे स्टाईलमध्ये रोखठोख उत्तर दिले आहे. तसेच भाजपाची अधिवेशनामधील दोन दिवसांची वर्तवणूक ही महाराष्ट्राची मान शरमेने मन खाली घालणारी होती अशी टीकासुद्धा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन आज संपले. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, परिवहन मंत्री अनिल परब यांनी संयुक्त पत्रकार परिषद सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.

या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूला अजित पवार आणि दुसऱ्या बाजूला बाळासाहेब थोरात बसलले होते. यावेळी पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर भाजप शिवसेना पुन्हा युती होणार अशी चर्चा रंगली आहे. असा सवाल पत्रकारांनी विचारताच उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘मी दोघांच्या म्हणजेच अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्या मध्ये आहे. मला बाहेर निघायचे असेल तर या दोघांना टाळण शक्य आहे का?’ असा प्रश्न उपस्थित करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकार टिकेल का या प्रश्नाला आपल्या ठाकरी स्टाईलने उत्तर दिले आहे.

विरोधकांना जोरदार टोला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, एका गोष्टीचा अजूनही उलगडा होत नाही. मुद्दा काय होता. केंद्राकडे इम्पिरेकल डेटा मागण्याचा होता. यामध्ये नवीन आम्ही काय केले. जेव्हा पंतप्रधानांची भेट घेतली तिन्ही पक्षाचे आम्ही नेते होतो त्यावेळी आम्ही इम्पिरेकल डेटाची मागणी सुद्धा केली होती. राज्यपालांना भेटून त्यांना देखील विनंती केली होती ही माहिती केंद्राकडे आहे ती मिळवण्यासाठी आम्हाला मदत करा. तोच ठराव आम्ही विधिमंडळात केला तर यात चुकीचे काय आहे आणि एवढ्या मिरच्या जोंबण्याचं कारण काय? ओबीसी समाजाच्या बाबतीत जर आपल्या मनात द्वेश असेल तर तो वेगळ्या पद्धतीने तुम्ही प्रकट करु शकत होता.

देवेंद्र फडणवीसांना टोला
अधिवेशनात सोमवारी झालेल्या गोंधळावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. ते म्हणाले कि, कालच विधिमंडळात झालेला गोंधळ हा राज्याला काळीमा फासणारा आहे. उत्कृष्ट संसदपटू हा बहुमान लावल्यानंतर कोणी अस वागू शकत का ? असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.