सातारा जिल्ह्यात १९ नवे कोरोनाग्रस्त; कराड तालुक्यातील तारुख बनतेय हाॅटस्पाॅट

0
74
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड व एन. सी.सी.एस. पुणे यांच्याकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार आज दिवसभरात 19 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. यामध्ये एकट्या कराड तालुक्यात 10 कोरोना बाधित सापडले आहेत. तारुख हे गाव आता नवे कोरोना हाॅटस्पाॅट बनत असून दिवसभरात तारूख येथे ९ कोरोनाग्रस्त सापडले आहेत. यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे.

यामध्ये पाटण तालुक्यातील शितापवाडी येथील 72 वर्षीय पुरुष, पालेकरवाडी (बहुले ) येथील 50 वर्षीय पुरुष व 65 वर्षीय महिला. कराड तालुक्यातील रेठरे खुर्द येथील 45 वर्षीय महिला, तारुख येथील 20,40,56,40 व 45वर्षीय पुरुष व 7 वर्षीय मुलगी, वाई तालुक्यातील कवठे येथील 20 वर्षीय पुरुष, एकसर येथील 25 वर्षीय पुरुष, कोरेगांव तालुक्यातील पिंपोडे येथील 35 वर्षीय पुरुष, सातारा तालुक्यातील गोवे (लिंब ) येथील 36 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here