२० लाख कोटींच्या पॅकेजचे सोन्याच्या किंमतीवर परिणाम; जाणुन घ्या आजचे भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काळ बुधवारी सोने-चांदीच्या भावात घसरण झाली. एकीकडे, जेथे मंगळवारी सोन्याच्या किंमतीत सुधारणा झालेली होती, त्याच्या दुसर्‍याच दिवशी मात्र पुन्हा एकदा सोन्याची घसरण झाली आहे. वस्तुतः काल, मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटी रुपयांच्या मेगा रिलीफ पॅकेजची घोषणा केली. या पॅकेजचा परिणाम हा सोन्याच्या किंमतीवर झाला आणि त्यामुळे सोन्याच्या किंमती पुन्हा एकदा खाली आल्या. पुन्हा एकदा १० ग्रॅमसाठी सोने हे ४६००० रुपयांपर्यंत खाली आले, तसेच चांदीच्या किंमतीतही मंदी दिसून आली.

सोन्याच्या किंमती आज खाली आल्या आहेत
बुधवारी सोन्या-चांदीच्या किंमती ह्या कमी झाल्या. केंद्र सरकारच्या ‘महापॅकेज’च्या घोषणेनंतर पुन्हा एकदा सोन्याचे भाव गडगडले. पीएम मोदी यांनी २० लाख कोटींचे आर्थिक मदत पॅकेज जाहीर केले आहे, कोरोनामुळे रखडलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हे पॅकेज जाहीर केले गेले. या पॅकेजच्या घोषणेनंतर शेअर बाजारात मात्र तेजी दिसून आली. त्याचबरोबर सरकारच्या या निर्णयामुळे आपली अर्थव्यवस्था उंचावेल अशी आशा गुंतवणूकदारांमध्ये निर्मांण झाली आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी त्यांचे लक्ष शेअर मार्केट मध्ये असलेल्या पर्यायांकडे वळविले ज्याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर झाला. सोन्याच्या किंमतींबद्दल बोलतांना सोन्याचे वायदा बाजारातील मूल्य हे बुधवारी ०.१९ टक्क्यांनी घसरले. सोने ८७ रुपयांनी घसरून १० ग्रॅम साठी सोन्याचा दर ४५,५३८ रुपयांवर आला होता.

चांदीच्या दरमध्येही घसरण
दुसरीकडे चांदीचा वायदा ०.३४ टक्क्यांनी घसरून ४२,९०८ रुपये प्रतिकिलो राहिला. जागतिक बाजारात आज सोन्याच्या किंमतीत किंचितसी वाढ झाली आहे. आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थान ०.१ टक्क्यांनी वधारून ते प्रतिऔंस १,३०४.२३ डॉलरवर पोहोचले. भारतीय बाजारपेठेतील सोन्याच्या किंमतींकडे नजर टाकल्यास ते आज प्रति १० ग्रॅम १२३ रुपयांनी घसरून ४५८८१ रुपयांवर गेले. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार आज ९९.९ टक्के शुद्धतेसह सोन्याची किंमत ही ४६,००४ रुपयांवरून घसरून ४५८८१ रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे. त्याच वेळी, ९९.५ टक्के शुद्धतेसह सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४५६९७ रुपयांवर पोहोचली. तर चांदीचा दर ४३,००५ रुपयांवरुन ४२८७५ रुपये प्रतिकिलोवर आला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.