कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सोमवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड येथील निवासस्थानी मंत्री अमित विलासराव देशमुख व मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांची कमरबंद चर्चा झाली. मात्र या राजकीय कमराबंद चर्चेची राज्यभर मोठी चर्चा सुरू आहे. यानंतर आता तिनही नेते मुंबईकडे रवाना झाले असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात अस्वस्थता पसरली आहे. महाविकास आघाडी सरकारमधे कॉंग्रेसला अपेक्षित स्थान मिळत नसल्याच्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभुमीवर मुंबईत महाविकास आघाडीच्या बैठका सुरू आहेत. या बैठकीसाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा यांनी उपस्थित रहावे असा आग्रह केला जात होता. मात्र पृथ्वीराज बाबांनी कराड दक्षिण मतदार संघात वेळ देऊ केल्याने मुंबईला जाणे नापसंत केले. अभ्यासू व्यक्तीमत्त्व असलेल्या पृथ्वीराज बाबांनी मुंबईल यावे हा आग्रह करण्यासाठी महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख आणि गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील हे सोमवारी दुपारी कराडला आले. कराड दक्षिणचे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे यांनी मंत्रीमहोदयांचे स्वागत केले. याप्रसंगी मलकापूरचे माजी नगराध्यक्ष मोहनराव शिंगाडे, नगरसेवक सागर जाधव, सुरेश जाधव यांची उपस्थिती होती.
बाबांच्या निवासस्थानी या दोन तरूण मंत्र्यांनी त्यांची भेट घेऊन तासभर चर्चा केली. पृथ्वीराज बाबांनी मुंबईला यावे आणि महाविकास आघाडीत समन्वय साधावा असा आग्रह या मंत्र्यांनी केला. या दोन मंत्र्यांनी सुमारे दीड तास आग्रह केल्यानंतर अखेर पृथ्वीराज बाबा मुंबईला रवाना होण्यास तयार झाले. मंत्री अमित विलासराव देशमुख व सतेज ऊर्फ बंटी पाटील हे पृथ्वीराज बाबांना सोबत घेऊनच मुंबईला रवाना झाले. कराड दक्षिणेतील जनतेच्या पाठबळावर आजही पृथ्वीराज बाबांचे राज्याच्या राजकारणात वजन कायम आहे. या घटनेच्या निमित्ताने ते पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
तीन दिवसापूर्वी राज्य सरकामधील काँग्रेसच्या भुमिकेबद्दल मंत्री सुनील केदार यांच्या मुंबई येथील बंगल्यात काही निवडक मंत्री व काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली होती. त्या बैठकीला मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील उपस्थित होते. त्यामुळे तिघांच्या तासभर झालेल्या गुप्त कमरांबद बैठकीत राजकीय खलबते उडाली आहेत. मंत्री अमित देशमुख हे आज सांगली दौऱ्यावर होते. मंत्री बंटी पाटील पुण्याच्या दौऱ्यावर होते. दोघांनीही एकमेकांशी फोनवर संपर्क साधला. अन् दोघेही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेण्यासाठी कऱ्हाडात थांबले. सायंकाळी पाचच्या सुमारास पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाटण कॉलनी येथील निवासस्थानी दोघेही आले. चव्हाण यांच्यासोबत दोघांची तब्बल तासभर कमराबंद बैठक झाली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.