वाशीम जिल्ह्यात यंदाच्या कापूस हंगामात शासकीय कापूस खरेदी केंद्रावर कापसाची विक्रमी खरेदी

वाशीम प्रतिनिधी । कारंजा येथे २ डिसेंबर २०१९ पासून सीसीआय मार्फत शासकिय कापूस खरेदी केंद्रावर कापूस खरेदी सुरु आहे. यंदाच्या कापूस हंगामात शासकीय कापूस खरेदी केंद्रावर तब्बल ३० हजार क्विंटल कापसाची विक्रमी खरेदी करण्यात आली असून कापसाची खरेदी फेब्रुवारी अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. खुल्या बाजारात कापसाचे दर पडल्याने पणन महासंघाच्यावतीने कापसाची शासकीय खरेदी सुरू करण्याचा … Read more

सांगलीच्या गुलाबांनी साजरा होणार दिल्ली आणि मुंबईकरांचा ‘व्हॅलेंटाईन डे’; रेल्वेने फुलांची निर्यात सुरू

सांगली प्रतिनिधी । व्हॅलेंटाईन डे साठी दिल्ली व मुंबईत डच गुलाब या हरितगृहातील फुलांना मागणी असल्याने गेले दोन आठवडे दररोज मिरजेतून रेल्वेने दिल्लीला व्हलेंटाईन डे साठी हरितगृहातील फुलांची मोठ्याप्रमाणात निर्यात सुरू आहे. व्हॅलेंटाईन डेसाठी मागणीमुळे डच गुलाबाचा दर चांगलाच वधारला आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात हरितगृहात मोठ्या प्रमाणात डच गुलाबाचे उत्पादन होते. व्हॅलेंटाईन डे साठी … Read more

कराडमध्ये दिवसाढवळ्या वाळूचोरी जोमात, प्रशासन कोमात

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात वाळू उपसावर बंदी असल्याने अनेकजण प्रशासन कधी वाळू उपसाचा निर्णय घेणार याकडे नजरा लावून बसलेले आहेत. मात्र कराड शहरालगत वारंवारं नागरिक वाळूचोरीची तक्रारी करत असूनही दिवसाढवळ्या होणारी वाळूचोरी प्रशासनाला दिसत नाही. त्यामुळे वाळूचोर जोमात आणि प्रशासन कोमात असे चित्र पहायला मिळत आहे. दिवसाढवळ्या वाळूचोरी करणारे वाळूचोर आणि महसूल … Read more

पर्यावरणाच्या संपूर्ण अभ्यासासाठी दर्जेदार पुस्तक – पर्यावरण व परिस्थितिकी

पुस्तकांच्या दुनियेत | स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची एक खासियत असते. प्रत्येकजण आपली अभ्यासाची एक वेगळी शैली जोपासून असतो. पुस्तकं कोणतीही वाचली तरी नोट्स काढणं हे प्राधान्याने ठरलेलंच असतं. पण एखादं असं पुस्तक बाजारात आलं असेल की ज्यामध्ये विषयाच्या नोट्सच तुम्हाला काढून दिलेल्या असतील..? ते ही झकास रंगसंगती आणि चित्रांच्या माध्यमातून..!! ऐकायला थोडं वेगळं वाटलं … Read more

कर्जमुक्ती योजनेसंदर्भात शंका असल्यास मंत्रालयातील या नंबरवर संपर्क साधा

टीम हॅलो महाराष्ट्र | महाविकास आघाडी सरकारने नुकतीच महात्मा फुले कर्जमुक्ती योजना जाहीर केली. लवकरच या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना मिळण्यास सुरू होईल. या योजनेविषयी शेतकऱ्यांच्या मनात असणाऱ्या शंकांच निरसन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने दूरध्वनी क्रमांक जाहीर केला आहे. या दूरध्वनी द्वारे शेतकऱ्यांना या योजनेविषयीची माहिती दिली जाणार आहे. मंत्रालय स्तरावर हा संपर्क कक्ष सुरू राहणार आहे. … Read more

सरकारने धरणांवर खर्च करण्यापेक्षा शेतकर्‍यांना ठिबक सिंचन पुरवावं – शरद पवार

सातारा प्रतिनिधी | पाण्याचा प्रश्न पाहता सरकारने शेतकर्‍यांना ठिबक सिंचनाची सुवधा पुरवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील के. एम. शुगर साखर कारखान्याच्या २ लाख ५१ हजाराव्या साखर पोत्याचे पुजन आज पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना पवार यांनी ऊस उत्पादक शेतकर्‍यांना सरकारने ठिबक … Read more

६२८ शेतकर्‍यांच्या कुंडली बदलल्या, गुगल ट्रान्सलेटरचा झटका

सांगली प्रतिनिधी | पंतप्रधान कृषी सन्मान योजनेत लाभार्थी असलेल्या ६२८ शेतकर्‍यांच्या कुंडली बदलल्याचा प्रकार सांगलीत घडला आहे. गुगल ट्रान्सलेटरमुळे सदर शेतकर्‍यांच्या कुंडली बदलल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील पंतप्रधान कृषी सन्मान योजनेसाठी लाभार्थी असणार्‍या शेतकर्‍यांची यादी सेतु द्वारा करण्यात आली होती. सदर यादीची इंग्रजी भाषेतील … Read more

ऑस्ट्रेलियात आगीतून वाचलेल्या भुकेल्या प्राण्यांसाठी चालवली जात आहे कौतुकास्पद मोहीम

ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेला वणव्याची आग जरी विझली असली तरी या आगीतून बचावलेल्या प्राण्यांचा जगण्याचा संघर्ष अजून संपलेला नाही आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स सरकारने एक कौतुकास्पद मोहीम हाती घेतली आहे. ‘ब्रश-टेल्ड रॉक वॉब्ली’ हा कांगारू सदृश प्राणी न्यू साउथ वेल्सच्या भूभागात राहणार दुर्मिळ प्राणी. ज्यावेळी जंगलात आग लागली त्याची धग या वन्यजीवांच्या वसाहतींना लागली. अनेक वॉब्लीजनी आपला जीव या आगीत वाचवला. परंतु जंगलच बेचिराख झाल्याने प्राण्याची अन्नाची दैना झाली. अशा परिस्थिती न्यू साउथ वेल्स सरकारने ‘ऑपरेशन रॉक वॅल्बी’ नावाची मोहीम हाती घेतली आहे.

युवाशक्तीने पुनरुज्जीवीत झाली विदर्भ पर्यावरण परिषद

विदर्भ पर्यावरण परिषदेत तरुणाई मोठ्या उत्साहाने आणि जोमाने सहभागी झाली.

महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या, एनसीआरबीच्या अहवालात समोर आली बाब

सरकारी धोरण आणि निसर्गाच्या लहरी कचाट्यात सापडून देशात शेतकऱ्यांचे आत्महत्या सत्र सुरूच आहे. शेतमालाला मिळणारा अनियमित भाव आणि दुष्काळ यातून देशातील शेतकरी आर्थिक विवंचनेतून शेतकरी आत्महत्येचा आकडा वाढतच आहे. याचा पुरावाच नुकत्याच जाहीर झालेल्या नॅशनल क्राइम ब्युरो रेकोर्ड्सच्या अहवालाने दिला आहे. या अहवालानुसार देशात सन २०१८ मध्ये देशभरात १० हजार ३४९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात दुर्दैवाची बाब म्हणजे या अहवालातून महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असल्याचे समोर आले आहे.