बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने सुचवलेल्या ‘ह्या’ वेब सीरिज तुम्ही पाहणार का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने संपूर्ण देशाभरात २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला आहे. या काळात अत्यावशक सेवा वगळता कोणालाही घराबाहेर पडण्याची परवानगी नाही. अशा परिस्थिती घरात बसून कंटाळलेल्या लोकांसाठी बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप याने काही चित्रपट आणि टीव्ही शो पाहण्यासाठी सुचवले आहेत.

अनुराग कश्यप बॉलिवूडमधील अनेक नामांकित दिग्दर्शकांपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्याने ट्विटच्या माध्यमातून ‘द आऊटसाईडर’, ‘द ऑक्युपेंट’ आणि ‘किंडम’ या वेब सिरीज पाहाण्यास सुचवले आहे.थोडक्यात जाणून घेऊयात काय आहेत या वेब सिरीजमध्ये:

द आऊटसाईडर – ही एक हॉरर वेबसीरिज आहे. ही सीरिज तुम्ही हॉट स्टारवर पाहू शकतात. ही वेब सीरिज प्रसिद्ध लेखक स्टीफन किंग यांच्या कादंबरीवर आधारित आहे.

 

द ऑक्युपेंट – हा एक स्पॅनिश ड्रामा चित्रपट आहे. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

 

 

किंडम – ही एक हॉरर वेबसीरिज आहे. ही वेबसीरिज तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता. या सीरिजचे आतापर्यंत दोन सीझन रिलीज झाले आहेत.

 

अनुराग कश्यप यांचे हे ट्विट सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे.अवघ्या काही तासांतच शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान काही लोकांनी तर अनुरागला देखील काही चित्रपट पाहण्यास सुचवले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

 

Leave a Comment