हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटात संचारबंदीमुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे बरेचजण आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा नागरिकांसाठी आता काही बँकांनी covid-१९ पर्सनल लोनची सोय उपलब्ध केली आहे. अत्यंत कमी व्याजदरात हे लोन मिळू शकणार आहे. एसबीआय, बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि बँक ऑफ इंडिया या बँकांनी ही योजना राबविली आहे. त्यामुळे तुम्ही आर्थिक संकटात असाल तर तुम्हालाही हे कर्ज मिळू शकते.
एरवी पर्सनल लोन वर ८.७५ पासून २५ % पर्यंत व्याजदर असतो मात्र या कर्जासाठीचा व्याजदर हा ७.२० पासून १०.२५ %पर्यंतच असणार आहे. सध्याच्या संकटकाळात ग्राहकांसाठी या बँकांनी ही कर्ज योजना राबविली आहे. त्यामुळे इतर वेळी कर्जाच्या २% असणारी प्रोसेसिंग फी या कर्जासाठी केवळ ५०० रुपये आहे. तसेच संकटकाळातील कर्ज असल्याने याचा परतफेड कालावधीही मर्यादित आहे. हा कालावधी कमाल तीन वर्षे इतका आहे. ग्राहकांना २५ हजार पासून ५ लाखांपर्यंतचे कर्ज मिळू शकणार आहे.
ही योजना बहुतेक बँकांमध्ये ३० जूनपर्यंत सुरु असणार आहे. त्यामुळे ज्यांना गरज असेल त्यांनी आपल्या जवळच्या बँकेत जाऊन चौकशी करण्यास हरकत नाही आहे. या कर्जासाठी कोणतेच प्रिपेमेंट शुल्क आकारले जाणार नाही आहे. जर तुम्ही कर्जाची परतफेड मुदतीच्या आधी केली तरी तुम्हाला त्यावर अधिक शुल्क द्यावे लागणार नाही. अशी माहिती समोर आली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.