दिवाळीपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना थकित वेतन मिळण्यासाठी परिवहनमंत्र्यांशी चर्चा करणार; शरद पवारांचं आश्वासन

मुंबई । ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कामगारांची गैरसोय होऊ नये, दिवाळीपूर्वी थकित वेतन मिळावं यादृष्टीने परिवहनमंत्र्यांशी तातडीने चर्चा करण्याचं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी एसटी संघटनेच्या प्रतिनिधींना दिलं. एसटी कामगारांच्या थकित वेतनाच्या प्रश्नावर महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे व जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी आज (मंगळवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय … Read more

अजित पवारांची डोकेदुखी वाढणार? राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी याचिका दाखल होणार

मुंबई । महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (Maharashtra state co cooperative bank scam) घोटाळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अ़डचणी वाढण्याची शक्यता आहे. या को ऑपरेटीव्ह बँक घोटाळ्याच्या क्लोजर रिपोर्ट विरोधात एका माजी मंत्र्यासोबत पाच जण विनंती याचिका दाखल करणार आहेत. हजारो कोटी रुपयांच्या या घोटाळ्यात मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखेने अजित पवार आणि अन्य 69 … Read more

मोदी सरकारचा मोठा निर्णय; आता जम्मू-काश्मीरमध्येही जमीन खरेदी करता येणार, पण…

नवी दिल्ली । जम्मू-काश्मीमधील कलम 370 हटवल्यानंतर मोदी सरकारनं अजून एक मोठा निर्णय घेतला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये अन्य राज्यातील नागरिक आता जमीन खरेदी करु शकणार आहेत. ही जमीन उद्योग-व्यवसायासाठी खरेदी करता येणार आहे. मात्र, अन्य राज्यातील लोकांना शेतजमीन खरेदी करता येणार नाही. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून या निर्णयाबाबत नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. या नोटिफिकेशननुसार केंद्रीय गृह मंत्रालयाने … Read more

एकनाथ खडसेंच्या पक्षांतरानंतर भाजपनं आयोजित केलेल्या बैठकीला रक्षा खडसेंची दांडी; चर्चेला उधाण

जळगाव। एकनाथ खडसेंच्या पक्षांतरानंतर आयोजित करण्यात आलेल्या जळगावातील भाजप बैठकीला खासदार रक्षा खडसे अनुपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर डॅमेज कंट्रोलची चाचपणी करण्यासाठी जळगाव जिल्हा भाजपच्या कोअर कमिटीची ही बैठक होत असल्याची माहिती आहे. भाजपच्या या तातडीच्या बैठकीला माध्यमांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. बैठकीचे कारण अद्याप अस्पष्ट असून पक्षसंघटनेच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी … Read more

राज्यपाल नियुक्त जागांसाठी महाविकास आघाडीने कसली कंबर; तिकिटासाठी ‘ही’ नाव चर्चेत

मुंबई । विधान परिषेदेत राज्यपाल नियुक्त जागांबाबत महाविकासआघाडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. उद्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या १२ जागांबाबत प्रस्ताव आणला जाणार आहे. १२ नावांना मंत्रिमंडळाची मंजुरी देऊन ती यादी मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवली जाणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिनही पक्ष प्रत्येकी चार नावं देणार आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल विरुद्ध महाविकासआघाडी … Read more

मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचे सावट; गुप्तचर विभागाच्या माहितीनंतर पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई । दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता होण्याची शक्यता येत आहे. पुढील ३० दिवस सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईवर दहशतवादी हल्ला होण्याची माहिती गुप्तहेर विभागाने दिली आहे. त्याचवेळी हा हल्ला ड्रोनद्वारे हा हल्ला होण्याची शक्यता असल्याने मुंबई शहरात ड्रोन उडविण्यावर पोलिसांनी बंदी घातली आहे. पुढील महिन्यात दिवसात दिवाळीचा सण आहे. कोरोनामुळे सर्व … Read more

खळबळजनक! लग्नाची मागणी धुडकावल्याच्या रागातून ‘या’ चित्रपट अभिनेत्रीवर चाकू हल्ला

मुंबई । लग्नाची मागणी धुडकावल्याच्या रागातून मुंबईत चित्रपट अभिनेत्री मालवी मल्होत्रा हिच्यावर चाकूहल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मालवीवर कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मालवीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या योगेशकुमार महिपाल सिंग या आरोपीने तिला लग्नाची मागणी घातली होती. मात्र मालवीने लग्न करण्यास नकार दिल्याच्या रागातून त्याने तिच्यावर चाकू हल्ला केल्याचा आरोप आहे. … Read more

‘मी जीव धोक्यात घालून मराठा समाजासाठी सर्व करून थकलो, आतातरी सरकारने ताबडतोब पावलं उचलावीत- खा. संभाजीराजे

मुंबई । “मी किती वेळा बोलायचं. मी माझा जीव धोक्यात घालून सर्व ठिकाणी फिरत असतो. जालना, कोल्हापूर, नवी मुंबई या ठिकाणी होतो. मी आता बोलून बोलून थकलो आहे. मी गर्दीत सोशल डिस्टन्सिंग न पाळता फिरत आहे. मी काय सांगायचे, मी माझा जीव धोक्यात घालून सर्व समाजासाठी करत आहेत. काय बोलायचं अजूनही वेळ गेलेली नाही, सरकारने … Read more

मराठा आरक्षणप्रकरणी विनायक मेटेंनी केला राज्य सरकारवर ‘हा’ धक्कादायक आरोप

मुंबई । मराठा आरक्षणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर धक्कादायक आरोप केला आहे. मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठाकडेच व्हावी असं राज्य सरकार बोलत असलं तरी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी सांगूनही घटनापीठ गठीत करण्यासाठी सरकारने कोर्टात अर्ज सादर केलेलाच नाही, असा आरोप विनायक मेटे यांनी केला आहे. त्यामुळे राज्य सरकार मराठा … Read more

‘कुटुंब नियोजनामुळेचं देशात हिंदुंच्या संख्येत घट’, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह पुन्हा एकदा बरळल्या

भोपाळ । आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत राहणाऱ्या भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांनी पुन्हा एकदा आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. कुटुंब नियोजनामुळे हिंदुंच्या संख्येत घट होत असल्याचं प्रज्ञासिंह यांनी म्हटलं आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये छोला दसरा मैदानात विजयादशमी निमित्त आयोजित कार्यक्रमात साध्वी प्रज्ञासिंह बोलत होत्या. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते कमलनाथ, दिग्विजय सिंह आणि मेहबुबा मुफ्ती … Read more