चीनी सरकारने Air India च्या विमानांना हॉंगकॉंगसाठी उड्डाण करण्यास घातली बंदी, संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताची सरकारी विमान कंपनी एअर इंडियाला दोन आठवड्यांसाठी हाँगकाँगमध्ये उड्डाण करण्यास बंदी घातली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दिल्ली सरकारने हॉंगकॉंगसाठी नियमित उड्डाणे करणाऱ्या एअर इंडियावर चीनी सरकारने बंदी घातली आहे. ज्यामुळे सोमवारी उड्डाण करणारे एअर इंडियाची विमाने हॉंगकॉंगला गेली नाही. हाँगकाँगहून दिल्लीला परतणारी उड्डाणेही दिल्लीत आली नसल्याचे माध्यमांच्या वृत्तानुसार सांगण्यात येत आहे. एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँगच्या विमानात 14 ऑगस्ट रोजी 11 कोविड -१९ च्या संसर्गाची प्रकरणे पाहायला मिळाली, त्यानंतर चीनी सरकारने एअर इंडियाच्या हॉंगकॉंगच्या उड्डाणावर बंदी घातल्या.

South China Morning Post च्या अहवालात असे म्हटले आहे की हॉंगकॉंगने एअर इंडियाच्या फ्लाइट ऑपरेटिंगवर बंदी घातली आहे. कारण एअर इंडियावर अनेक कोरोना संक्रमित रुग्ण घेतल्याचा आरोप आहे. 17 ऑगस्टला एअरलाइन्सने घोषित केले की दिल्ली-हाँगकाँगची विमान उड्डाणे पुढे ढकलण्यात आली आहेत.

 

चीनच्या सरकारच्या या निर्णयाचा फटका भारतात अडकलेल्या हजारो हाँगकाँगच्या प्रवाशांवर झाला आहे. प्रवाश्यांनी सोशल मीडियावर ट्रॅव्हल प्लॅन रीशेड्यूल करण्यास सांगितले. एअर इंडियाने प्रवाश्यांच्या ट्विटला उत्तर देताना सांगितले की, हाँगकाँगच्या अधिकाऱ्यांनी घातलेल्या निर्बंधामुळे एआय 310/315, दिल्ली-हाँगकाँग-दिल्ली उड्डाण 18 ऑगस्ट 2020 रोजी पुढे ढकलण्यात आले आहे. या संदर्भातील अधिक माहिती लवकरच शेअर केली जाईल. प्रवासी एअर इंडियाच्या कस्टमर केअरशी संपर्क साधू शकतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.