हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला आज वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा हवा आहे. कारण एका सर्वसामान्य घरातील मुलीचा जीव गेलाय आणि तिच्या आत्महत्या प्रकरणात मंत्री महोदयांचं नाव आलंय. त्यामुळे लोकांच्या मतानुसार राठोड यांच्या राजीनाम्याचा भारतीय जनता पक्ष आग्रह धरत आहे.अधिवेशनच्या आधी राजीनामा घेण्याची कृती कुठलंही संवेदनशील नेतृत्व नक्की करेल आणि मुख्यमंत्री व पवार साहेब हे नक्कीच राठोड यांचा राजीनामा घेतली अशी मला अपेक्षा आहे असं मत भाजपचे नेते आणि माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
तसेच तावडेंनी सामनावर देखील टीका केलीय.ते म्हणाले “सामनाच्या संपादकीयमध्ये आता कथा लिहायला सुरुवात झाली आहे. नुसत्या कथेने काही होणार नाही. जगामध्ये सर्वत्र इंधनाची दरवाढ होते आहे हे लोकांना माहिती आहे. कर्नाटक, गुजरात आणि गोव्यामध्ये महाराष्ट्रापेक्षा पेट्रोल-डिझेलवर कर कमी आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेल तिथे स्वस्त आहे. मग अशा परिस्थितीत इंधनावरचे कर संजय राऊत यांचं सरकार कमी का करत नाही? श्रीलंका नेपाळ सोडा तुमच्या बाजूच्या राज्यात जर दर कमी आहे तर मग आपल्याकडे दर जास्त का आहेत याच उत्तर त्यांनी द्यावं.
दरम्यान, वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर भाजप खूप आक्रमक झाला आहे. काल भाजप नेत्या चित्र वाघ यांनी पुण्यातल्या वानवडी भागातील हेवन पार्क या ठिकाणी भेट देऊन पूजा चव्हाणने ज्या ठिकाणी आत्महत्या केली होती त्या जागेची पाहणी केली. तसेच वानवडी पोलीस ठाण्यात भेट देऊन लवकरात लवकर तपास मार्गी लावण्याची मागणी केली होती. एकंदरीतच येत्या काळात पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण शिवसेनेला आणि प्रामुख्याने संजय राठोड यांना महागात पडू शकतं असं चित्र सध्या दिसतंय.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.