हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूची प्रकरणे समोर येत आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) याबाबत म्हणतो की, ही नवीन प्रकरणे कुठे सुरू झाली याबद्दल अजूनही आमच्याकडे काही माहिती नाही आहे. मात्र असा दावा केला जात आहे की या नवीन प्रकरणांचे कनेक्शन ने सॅल्मन फिशशी संबंधित असू शकते. असे होऊ शकते की आयात केलेल्या सॅल्मन फिश किंवा त्यांच्या पॅकेजिंगमुळे हा संसर्ग पसरला. नवीन प्रकरणे समोर आल्यापासून चीननेही याबाबत अनेक अनेक तयारी केल्या आहेत.
चीनमध्ये अनेक ठिकाणी नुसता लॉकडाउनच लादण्यात आलेले नाही तर शाळा देखील बंद करण्यात आल्या आहेत. असेही म्हटले जात आहे की हा विषाणू आशियातील एका मोठ्या फूड मार्केट मधून पसरत आहे. अलीकडेच मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या संसर्गाची नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. स्थानिक वृत्तपत्र म्हणते की, बीजिंगच्या शिनफादी बाजाराच्या चॉपिंग बोर्डवर हा विषाणू सापडला आहे, जो आयात केलेल्या सॅल्मन फिशसाठी वापरला जातो. अशा परिस्थितीत व्हायरसच्या या दुसर्या लाटे विषयी चीनमध्ये चिंता चांगलीच वाढलेली आहे.
डब्ल्यूएचओच्या आपत्कालीन कार्यक्रमाचे प्रमुख माईक रायन म्हणाले की,” मला वाटते की या प्रकरणात काय घडले आहे ते पहिले पाहणे आवश्यक आहे,” ते असेही म्हणाले की,” ही एक मोठी गंभीर बाब आहे, ५० दिवस एकही प्रकरण समोर आले नाही,आणि आता अचानक कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या वाढत आहे. तज्ञांनी पहिल्यांदा असे सांगितले होते की, हा विषाणू माशांमधून परत आला आहे मात्र हे होणे शक्य नाही.”
चीन हा मांस आणि सीफूडचे आयात करणारा एक प्रमुख देश आहे. मात्र, कोरोना विषाणूचा संबंध असल्याच्या भीतीने युरोपमधून सॅल्मन माशांचा पुरवठा थांबविण्यात आला आहे. याबाबत रायन म्हणतात की, संयुक्त राष्ट्रांची एजन्सी या साथीच्या प्रादुर्भावावर नजर ठेवून आहे आणि चीनला अधिक तांत्रिक साहाय्य्य करण्याची ऑफर दिलेली आहे. यासह ते बीजिंग प्रशासनाच्याही सातत्याने संपर्कात आहेत. ते म्हणाले की, ‘जसे आपण बर्याच देशांमध्ये पाहिले आहे की, आता या संसर्गाची नवीन प्रकरणे समोर येत आहेत, विशेषत: ते कोठून आले हे माहित नाही, तर ही एक मोठी चिंतेची बाब आहे. परंतु यावेळी यावर त्वरित योग्य त्या उपाययोजना केल्या जाऊ शकतात. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार येथे १०० हून अधिक नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत मात्र असे असले तरीही इथे अद्यापपर्यंत एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.