हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेतील मिनियापोलिसमध्ये कृष्णवंशीय जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूबद्दल लोकांचा संताप अद्यापही शांत झालेला नाही. अलीकडेच,सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जिथे जॉर्जच्या हत्येचा आरोप असलेला एक पोलिस जेव्हा शॉपिंग मॉल मध्ये दिसून आला , तेव्हा तेथे उभ्या असलेल्या एका महिलेने त्याला थांबवले आणि त्याला भरपूर सुनावले. त्या पोलिस कर्मचाऱ्याकडे बघून ग्रोसरी स्टोअर मध्ये उभी असलेली ही महिला म्हणाली की,’ तू परत तुरूंगात जाशील. खरं तर, जे अलेक्झांडर कुएंग मिनेसोटाच्या प्लाइमाउथ येथील फूड क्लबमध्ये गेला होता तेव्हा तिथली एक स्त्री त्याच्यावर खूपच रागावली आणि त्याला भरपूर सुनावले.
जॉर्जच्या मृत्यूचा आरोप असलेला पोलिस अधिकारी कुएंगला शुक्रवारी रात्री ७,५०,००० डॉलर जमा करून हेनेपिन काउंटी जेलमधून जामीन मिळाला. त्यानंतर तिथे उभी असलेली आणखी एक बाई त्याच्यावर ओरडली की, तू क्षमा करण्या योग्य नाही आहेस. मला वाटत नाही की तुला जमीन मिळायला हवा. तुला येथे उभे राहण्याचा देखील अधिकार नाहीये. तू एका निर्दोष माणसाला मारलेस. तू तुरुंगात परत जावेस अशी आमची इच्छा आहे.
जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूचे असे संपूर्ण प्रकरण आहे
खरं तर,२५ मे रोजी, एका कृष्णवंशीय अमेरिकन जॉर्ज फ्लॉइडला बनावट $ २० ची नोट वापरल्याच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केली होती. या घटनेचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत ज्यात एक पोलिस ७ मिनिटे जॉर्जच्या मानेवर गुडघे टेकून बसलेला दिसला. ‘मला श्वास घेता येत नाही’ असे सांगून जॉर्ज बेशुद्ध झाला, मात्र तरीही आरोपी पोलिस अधिकारी डेरेक शविन याला काहीच वाटले नाही. डेरेकबरोबर अलेक्झांडर कुएंग, थॉमस लेन आणि तू थाओ अशीही नावे या अपघातात सामील आहेत. जॉर्जच्या मृत्यूनंतर पोलिसांच्या या वर्णभेदी अत्याचाराविरूद्ध लोक रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, निषेधाच्या वेळी अमेरिकेत अनेक ठिकाणी हिंसाचार, जाळपोळ, दुकानांमध्ये तोडफोड आणि लूटमार या घटनाही समोर आल्या आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.