हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूची औषधे बनविणारी कंपनी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स ला ३१ मार्च २०२० ला समाप्त झालेल्या चौथ्या तिमाहीत २२०.३ करोड रुपयांचा नफा झाला. वर्षभराच्या पहिल्या तिमाहीतील १६१.६६ करोड रुपयांच्या तुलनेत हा नफा ३६.२८% अधिक आहे. कंपनीने शेयर बाजारात सांगितले की, या काळात त्यांचे एकूण उत्पन्न ७.९६% वाढून २,७६७.४८ करोड पर्यंत पोहोचले आहे. वर्षाच्या पहिल्या तिमाहीत हा २,५६३.४७ करोड रुपये होता. वित्तीय वर्ष २०१९-२० मध्ये कंपनीला २०१८-१९ च्या ९२४.९९ करोड रुपयांच्या तुलनेत ७७५.९७ करोड रुपयांचा एकूण लाभ झाला आहे.
या दरम्यान कंपनीचा महसूल देखील ९,८६५.४६ करोड रुपयांच्या तुलनेत वाढून १०,६४०.९६ रुपयांवर पोहोचला आहे. ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स चे चेअरमन तसेच प्रबंध निदेशक (एमडी) ग्लेन सल्दान्हा यांनी सांगितले की, “कोविड-19 महामारी आणि जागतिक बाजारातील जेनेरिक औषधांच्या आव्हानात्मक वातावरणामुळे चौथ्या तिमाहीत आमचे उत्पन्न वाढले आणि त्याचा वेग वाढला आहे.” कंपनीच्या निर्देशक मंडळाने वित्तीय वर्ष २०२९-२० साठी आपल्या शेयर धारकांसाठी एका रुपयांच्या अंकित मूल्याच्या प्रत्येक शेयर वर २.५० रुपये म्हणजे २५०% नफा देण्याची शिफारस केली आहे.
ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स नी कोविड-19 च्या सामान्य रुग्णांसाठी उपचारासाठी फेविपिराविर या अँटिव्हायरल औषधाला फॅबिफ्लू नावाने लाँच केले होते. याची किंमत १०३ रु ठेवली गेली. ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स नी सांगितले, हे औषध २००एमजी मध्ये उपलब्ध आहे. याच्या ३४ गोळ्यांच्या पाकिटाची किंमत ३,५०० रुपये आहे. कोविड-19 च्या उपचारासाठी फेविपिराविर हे औषध आहे. ज्याला मंजुरी मिळाली आहे. चिकित्सकांच्या सल्ल्यानुसार या औषधाची किंमत १०३ रु प्रति टॅबलेट ठेवली आहे. असेही त्यांनी सांगितले आहे. पहिल्या दिवशी या गोळीचा १८००एमजी डोस घ्यावा लागतो तर पुढचे १४ दिवस ८०० एमजी चा डोस घ्यावा लागतो अशी माहितीही त्यांनी दिली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.