कोरोनापासून बचावासाठी न्यूयॉर्क सरकारचा नागरिकांना हस्तमैथुन करण्याचा सल्ला !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातल्या जवळपास सगळ्याच देशांमध्ये कोरोनाचा कहर चाली आहे.या कोरोनामुळे बहुतेक लॉकडाउन आहे.तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, कंपन्या, कार्यालये बंद असल्यामुळे सर्वचजण घरीच आहेत. ज्यांना शक्य आहे,ते वर्कफ्रॉम होम करत आहेत. पण ज्यांच्याकडे असा पर्याय उपलब्ध नाही, त्यांना पहिले दोन-तीन दिवस संपल्यानंतर आता घरी बसून कंटाळा येऊ लागला आहे. अशावेळी लोकांना वेळेचा सदुपयोग करता येईल, यासाठी टीव्हीवरुन रामायण आणि महाभारत यांसारखे काही कार्यक्रमही दाखवले जात आहेत.

पण अमेरिकेतील न्यूयॉर्क सरकारने मात्र यावर वेगळा उपाय शोधून काढला आहे. त्यांनी नागरिकांना हस्तमैथुन करण्याचा सल्ला दिला आहे.कोरोना व्हायरसच्या संकटाचा परिणाम संपूर्ण जगावर झाला आहे.या परिस्थितीचा सामना करण्यासाठी लोक वेगवेगळे मार्ग शोधून काढत आहेत. काही जण कुटुंबासोबत असल्याने आनंदी आहेत तर काही जण या सुट्टीमध्ये आपले छंद जोपासत आहेत.

या कठिण काळात लैंगिक आरोग्याचा अभ्यास करणाऱ्या एका स्टडीने तणाव कमी करण्यासाठी एक उपाय सुचवला आहे. “चुंबनामुळे कोविड -१९ चा प्रसार होऊ शकतो. दुसरं कोणी नाही, तर तुम्हीच तुमचे सुरक्षित सेक्स पार्टनर आहात आणि साबणाने सेक्स टॉइज आणि हात स्वच्छ धुवत असाल तर, हस्तमैथुनामुळे कोविड-१९ चा फैलाव होणार नाही” असे न्यूयॉर्कच्या आरोग्य खात्याने अधिकृत टि्वटर अकाउंटवर म्हटले आहे.

 

हस्तमैथुनामुळे मानसिक आणि शारीरिक फायदा होत असल्याचे आतापर्यंत वेगवेगळया लैंगिक अभ्यास अहवालातून समोर आले आहे. हस्तमैथुनामुळे तणाव कमी होतो, चांगली झोप लागते, लक्ष केंद्रीत होण्याबरोबरच लैंगिक क्षमता वाढत असल्याचे काही लैंगिक अभ्यास अहवालातून समोर आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews’

हे पण वाचा –

मोठी बातमी! मुंबईत एका दिवसात सापडले कोरोनाचे ५९ रुग्ण, राज्यात करोनाग्रस्तांची संख्या ३०२ वर

कोरोना विषाणूनंतरचं जग – युवाल नोआ हरारी 

सोने चांदीच्या भावात झपाट्याने घट सुरुच, जाणुन घ्या आजचा दर

खुशखबर! विजेचे दर पुढच्या ५ वर्षांसाठी कमी होणार

WhatsApp ने स्टेटस व्हिडिओ १५ सेकंदाचा का केला? जाणुन घ्या या बदलाचे कोरोना, चीन कनेक्शन

धक्कादायक! अमेरिकेत १ ते २ लाख लोकांचा मृत्यू होण्याची भीती

जगातील पहिल्या कोरोनाग्रस्ताचा लागला शोध, कोण आहे ‘हा’ व्यक्ती? घ्या जाणून

भारत कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे म्हणजे नेमकं काय?

 

Leave a Comment