मोबाईल फोन तुटल्याने अटेंड करता आला नाही ऑनलाईन वर्ग; १० वी च्या विद्यार्थिनीची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे लागू केलेल्या लॉकडाउन दरम्यान मुलांच्या अभ्यासातही एक पर्याय समोर आला आहे तो म्हणजे ऑनलाइन अभ्यास घेणे आहे. देशातील अनेक शाळांचे शालेय सत्र हे एप्रिलमध्ये सुरू होते आणि यंदा अनेक शाळांमध्ये ऑनलाईन वर्गही सुरू झाले. मात्र, अशीही बरीच मुले आहेत, ज्यांना काही कारणास्तव या ऑनलाइन अभ्यासात सहभागी होता येत नाही आहे. अशीच एक घटना पश्चिम बंगालमधील हावडा येथून समोर आलेली आहे. येथे आपल्याकडे स्मार्टफोन नसल्यामुळे दहावीत शिकणाऱ्या एका युवकाने आत्महत्या केली आहे.

16 वर्षीय शिबानी कुमार शौ हिने आपल्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. तिचे वडील शांतू शौ, हे व्यवसायाने ट्रक चालक आहेत. ते म्हणाले की, लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्याच्या काही दिवस आधीच ते आपल्या पत्नी आणि तरुण मुलासह बिहारच्या समस्तीपूर येथील वडिलांच्या घरात रहायला आले होते. मात्र, त्यांचा दुसरा मुलगा शिवम आणि मुलगी शिबानी यांनी बंगालमध्येच राहण्याचा निर्णय घेतला. दोघेही एकच स्मार्टफोन वापरत होते. 26 मार्च रोजी त्यांच्या हातून फोन खाली पडला आणि खराब झाला. त्यामुळे या लॉकडाऊनमध्ये त्यांना फोनही करता आला नाही.

गळफास घेतलां जेव्हा भाऊ क्रिकेट खेळायला गेला होता
शांतू म्हणाले की शिबानीचे ऑनलाइन वर्ग 10 दिवसांपूर्वी सुरू झाले होते. तिला अशी भीती वाटत होती की जर तिने या ऑनलाईन वर्गास हजेरी लावली नाही तर ती नापास होईल, यामुळे ती खूपच उदास झाली होती. बुधवारी शिबानीने तिच्या वडिलांना दुसर्‍या मोबाईलवरून फोन करून आपल्या समस्या सांगितल्या. शांतू म्हणाले की तू त्रास करून घेऊ नकोस आणि जे क्लासेस मिस झालेत त्याच्या नोट्स इतर मैत्रिनींकडून मागून घे. हावडा येथे परत येताच तुला नवीन फोन घेईल. शिवम गुरुवारी दुपारच्या जेवणानंतर क्रिकेट प्रॅक्टिसला गेला होता. जेव्हा तो परत आला आणि त्याने अनेक वेळेला दार ठोठावल्यानंतरही शिबानी काही बाहेर आली नाही, त्याने खिडकीतून घरात पाहिलं तर आपल्या बहिणीला फास लावलेला पाहून तो स्तब्ध झाला.

एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘ आम्ही तपास सुरू केला गेला आहे आणि आत्तापर्यंत कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. सुरुवातीच्या तपासात आत्महत्येचे प्रकरण असल्याचे दिसते. ऑनलाइन वर्ग चुकल्यामुळे नैराश्य येऊन मुलीने असे पाऊल उचलले.’

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment