“संजय राऊतांना काय सत्य माहिती आहे, ते कधी काश्मीरला गेलेत काय?.”; देवेंद्र फडणवीसांचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटावरून सुरू असलेल्या वादावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी “कश्मिरची योजना जेवढी शिवसेनेला माहिती आहे तेवढी इतर कोणाला माहिती नाही, असे म्हंटले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. “संजय राऊतांना काय सत्य माहिती आहे? ते कशी काश्मीरला गेले आहेत का? राऊत व शिवसेनेला हे विचारायचे आहे कि “काय होतास तू काय झालास तू अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू,” असा टोला फडणवीस यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटावरून शिवसेना व संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले की, “गेल्या काही दिवसापासून संजय राऊत यांच्याकडून ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटावरून टीका केली जात आहे. त्यांना काय या चित्रपट आणि काश्मीर विषयी सत्य माहिती आहे. ते कधी काश्मीरला तरी गेले होते काय?

या सर्व संघर्षाच्या काळात संजय राऊत काहीच काश्मीरला गेलेले नाही. खरं तर सत्य पहिल्यादा बाहेर येत आहे. आणि ते सत्य बाहेर आल्यामुळे संजय राऊत अलीकडच्या काळात ज्या लोकांची वकिली करतात. त्याच्या सर्वांचे चेहरे त्या ठिकाणी उघडे पडत आहेत. त्यामुळे त्याची चिंता या ठिकाणी राऊत यांना दिसत आ, असे फडणवीस यांनी सांगितले.

Leave a Comment