दिल्लीत पेट्रोल पेक्षा डिझेल झाले महाग; जाणुन घ्या कारण

0
36
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी ऑईल मार्केटिंग कंपनी एचपीसीएलने बुधवारी डिझेलच्या दरात वाढ केली आहे. एचपीसीएलच्या वेबसाइटवर दिलेल्या दरांनुसार दिल्लीत सध्या एक लिटर डिझेलची किंमत 79.92 रुपये आहे. त्याचवेळी, एक लिटर पेट्रोलची किंमत 79.80 आहे. मात्र, देशातील सर्वात मोठी ऑईल मार्केटिंग कंपनी आयओसीने दिल्लीतील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर हे दररोज बदलतात आणि रोज सकाळी 6 वाजता ते अपडेट केले जातात.

पेट्रोलपेक्षा डिझेल महाग का झाले, ते जाणून घेऊयात ?
पेट्रोलपेक्षा डिझेलचा दर वाढण्याचे कारण म्हणजे राज्य आणि केंद्र सरकारकडून लावण्यात येणारा कर हे आहे. पण ऑक्टोबर 2014 मध्ये झालेल्या नोटाबंदीनंतर या दोघांमधील फरक बर्‍यापैकी कमी झाला आहे आणि आता डिझेलची किंमत ही पेट्रोलच्या किमतीपेक्षा वर गेली आहे.

अन्य राज्यांत डिझेल अजूनही पेट्रोलपेक्षा स्वस्त आहे. खरं तर, दिल्लीत पेट्रोलवर 64 टक्के कर आणि डिझेलवर 63 टक्के कर आकारला जातो, कारण हा कर जवळपास समान झाल्यामुळे दोघांच्या किंमतीतील फरक हा जवळजवळ संपुष्टात आला आहे.

एप्रिलपर्यंत दिल्लीतील कर हा देशातील सर्वात कमी कर होता, तर मुंबईत हा कर सर्वाधिक होता. मात्र दिल्ली सरकारने 4 मे रोजी डिझेलवरील व्हॅट 16.75 टक्क्यांवरून 30 टक्के केले आहे, तेव्हापासून दिल्लीत डिझेलचे दर हे मुंबईपेक्षा जास्त वाढलेले आहेत. पेट्रोलवरही व्हॅट वाढविण्यात आला होता, जो आधी 27 टक्के होता आणि आता तो 30 टक्के करण्यात आला आहे. यामुळे पेट्रोलच्या किंमतीत 1.67 रुपयांची वाढ झाली आहे, तर डिझेलच्या किंमती 7.10 रुपयांनी वाढल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here