नवी दिल्ली । एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) ने कोविड -१९ संबंधित 56.79 लाख आगाऊ दावे 31 डिसेंबर 2020 रोजी निकाली काढले आहेत. या दाव्यांनुसार ईपीएफओने 14,310 कोटी रुपयांचे वितरण केले आहे. ईपीएफओच्या भागधारकांना ही आगाऊ रक्कम परत देण्याची गरज भासणार नाही.
कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी मार्च महिन्यात देशव्यापी लॉकडाउन लागू करण्यात आला. त्यावेळी, केंद्र सरकारने ईपीएफओच्या सहा कोटीहून अधिक भागधारकांना त्यांच्या खात्यातून तीन महिन्यांच्या मूलभूत वेतन आणि महागाई भत्त्याची रक्कम काढण्यास परवानगी दिली होती.
31 डिसेंबरपर्यंत झाले इतके वितरण
सूत्रांनी सांगितले की, 31 डिसेंबर 2020 पर्यंत ईपीएफओने 56.79 लाख क्लीयरन्स क्लेमचे वाटप केले आणि 14,310 कोटी रुपये वितरित केले. सूत्रांनी सांगितले की, ईपीएफओने 31 डिसेंबर 2020 पर्यंत अंतिम तोडगा, मृत्यू, विमा आणि अॅडव्हान्सचे 197.91 लाख दावे वितरीत केले आहेत आणि 73,288 कोटी रुपये वितरित केले आहेत.
संघटित क्षेत्र बाधित
या कालावधीत वितरित करण्यात आलेल्या एकूण रकमेपैकी सुमारे 20 टक्के रक्कम कोविड -१९ अॅडव्हान्सशी संबंधित आहे. सूत्र असे म्हणतात की कोविड -१९ आगाऊ दाव्यांवरून असे दिसून येते की, देशातील असंघटित क्षेत्रातील कर्मचार्यांवर या साथीचा फार वाईट परिणाम झाला आहे. यावेळी, लोकांनी मोठ्या प्रमाणावर रोजगार गमावले आहेत.
पगार कपात
मोठ्या संख्येने लोकांचे पगार कापले गेले आहेत आणि जबरदस्तीने स्थलांतरही झाले आहे. साथीच्या आजारामुळे आर्थिक दुर्बल घटकासाठी केंद्राने 26 मार्च रोजी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना (पीएमजीकेवाय) सुरू केली. याशिवाय सरकारने ईपीएफ योजनेतून पैसे काढण्याची सुविधादेखील पुरविली होती. सूत्रांनी सांगितले की, या काळात खासगी ईपीएफ ट्रस्टने 4.19 लाख कोविड -१९ अॅडव्हान्स क्लेमचे वाटप केले तर 3,983 कोटी रुपये वितरित केले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.