सोलापूर प्रतिनिधी । आषाढी एकादशी म्हणजे विठ्ठलभक्तांचा जणू स्नेह मेळावाच असतो. वारीसोबत विठ्ठलाला भेटण्यासाठी लाखो भाविक पंढरपुरात येत असतात. मात्र यावर्षी वारी रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र मानाच्या पालख्या वाहनातून नेण्यात येणार होत्या. अशावेळी विनापरवाना सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा तालुक्यातील शिरशी येथील संदीप महादेवराव महिंद्र, योगेश उत्तमराव महिंद्र, तसेच पंढरपूर येथील किरण घाडगे हे पंढरपूर येथे छत्रपतींच्या पादुका घेऊन आले होते. या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस हवालदार परशुराम तात्याराम शिंदे यांनी या तीन शिवभक्तांविरुद्ध फिर्याद दिली आहे. नियम मोडल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला हे. आरोपी संदीप व योगेश महिंद्र यांनी कोणतीही परवानगी न घेता संचारबंदीच्या काळात पंढरपूर शहरात प्रवेश केला. यावेळी किरण घाडगे हे त्यांच्या जवळ होते. म्हणून त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपीना नोटीसही देण्यात आली आहे.
योगेश आणि संदीप महिंद्र हे रायगडाहून छत्रपतींच्या पादुका घेवून काल विठ्ठल भेटीसाठी पंढरपुरात आले होते. विना परवाना आले म्हणून पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आला आहे. राज्यातील कोरोना स्थिती पाहता अशापद्धतीने नियम मोडणे हा गंभीर गुन्हा मानला जातो आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.