शाहिद आफ्रिदीला कोरोनाची लागण; गौतम गंभीर म्हणाला…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी याला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. आफ्रिदीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबतची माहिती दिली. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या संस्थेच्या माध्यमातून आफ्रिदी पाकिस्तानातील अनेक गरजू व्यक्तींना मदत करत होता.

तसेच आफ्रिदी गेल्या काही दिवसांपासून आपल्या भारता विरोधी केलेल्या वक्तव्यांमुळेही चांगलाच चर्चेत आला होता. त्यावेळी त्याच्या प्रत्येक वक्तव्याला भारताचा माजी खेळाडू आणि सध्याचा भाजपाचा खासदार असलेल्या गौतम गंभीरने सडेतोड प्रत्युत्तर दिले. त्यामुळे सोशल मीडियावर अनेकदा या दोन्ही खेळाडूंमध्ये शाब्दिक युद्ध सुरु व्हायचं. मात्र आता आफ्रिदीला कोरोनाची लागण झाल्याची बातमीकळल्यानंतर गौतम गंभीरने तो यामधून लवकरात लवकर बरा व्हावा असे म्हंटले आहे.

 

गंभीर पुढे म्हणाला “माझी अशी इच्छा आहे की कोणालाही या विषाणूची लागण होऊ नये. माझ्यात आणि आफ्रिदीमध्ये राजकीय मतभेद असले तरीही त्याने यामधून लवकरात लवकर बरं व्हावं असं मला वाटतंय. आफ्रिदीपेक्षाही आपल्या भारत देशातील प्रत्येक कोरोनाग्रस्त रुग्ण यामधून बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे.” गौतम गंभीर ‘सलाम क्रिकेट २०२०’ या कार्यक्रमामध्ये बोलत होता.

सध्या पाकिस्तानमध्ये कोरोनाचे एक लाख ३२ हजारहून अधिक रुग्ण झाले आहेत तसेच आतापर्यंत तेथे अडीच हजारहून अधिक जणांचा मृत्यू देखील झाला आहे तसेच ५० हजार पाकिस्तानी या कोरोनामधून पूर्णपणे बरे झालेले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment