Wednesday, June 7, 2023

जर आपले पोस्ट ऑफिसमध्ये खाते असेल तर ते 11 डिसेंबरपूर्वी पूर्ण करा ‘हे’ काम, अन्यथा बंद केले जाऊ शकते खाते!

नवी दिल्ली । इंडिया पोस्टने पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची अंतिम मुदत जाहीर केली आहे. इंडिया पोस्टनेही शुक्रवारी एका ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली. या ट्विटनुसार पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यात आता किमान 500 रुपये शिल्लक ठेवणे बंधनकारक आहे. 11 डिसेंबरपर्यंत या खात्यात किमान 500 रुपये असले पाहिजेत.

या अगोदर इंडिया पोस्टद्वारे सर्व खातेधारकांना एक रिमाइंडर मेसेजही पाठविण्यात आला आहे. या मेसेजमध्ये असे म्हटले आहे की, पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यात किमान शिल्लक ठेवणे आता बंधनकारक असेल. जर तुम्हाला मेंटेनन्स चार्ज भरायचा नसेल तर 11 डिसेंबर 2020 पूर्वी तुमच्या खात्यात 500 रुपये नक्कीच ठेवा.

https://twitter.com/IndiaPostOffice/status/1334742106368212992?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1334742106368212992%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fbusiness%2Fpost-office-saving-accounts-minimum-balance-limit-deadline-for-the-same-is-11-december-2020-ndav-3364144.html

सध्याचा नियम काय आहे?
इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाईटच्या म्हणण्यानुसार, आर्थिक वर्षाच्या अखेरीस खात्यात किमान 500 रुपये न ठेवल्यास 100 रुपये मेंटेनन्स चार्ज म्हणून कट केला जाईल. जर खात्यात शिल्लक नसेल तर ते आपोआप बंद होतील.

पोस्ट ऑफिस बचत खाते कोणतीही प्रौढ व्यक्ती जॉईंट किंवा वैयक्तिकरित्या उघडू शकते. अल्पवयीन मुलांसाठी त्यांचे पालक त्यांच्या नावे देखील हे खाते उघडू शकतात. एखाद्या व्यक्तीच्या नावे केवळ एक पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट उघडता येते. हे खाते उघडताना नॉमिनेशन अनिवार्य आहे.

व्याज दर: सध्या वैयक्तिक व जॉईंट पोस्ट ऑफिस बचत खात्यावर 4 टक्के दराने व्याज मिळते. या खात्यावर मिळणाऱ्या व्याजाची गणना 10 तारखेपासून ते महिन्याच्या शेवटच्या तारखेच्या किमान शिल्लक रकमेच्या आधारे केली जाते. पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटनुसार या कालावधीत जर खात्यात शिल्लक 500 रुपयांपेक्षा कमी असेल तर त्यावर कोणतेही व्याज दिले जाणार नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.