काँग्रेसने “आणीबाणी” लागू करणे हे चुकचं होते : राहुल गांधी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काँग्रेस नेत्या आणि देशाच्या माझी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेली आणीबाणी ही चुकीचीचं होती असं कोझिकोडचे खासदार राहुल गांधींनी म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी असंही म्हटलं आहे की सध्या भारतात जे घडत आहे ते आणीबाणीपेक्षा ‘मूलभूतपणे वेगळे’ आहे. असं म्हणत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वर निशाणा साधला आहे.

आरएसएसने आपली माणसं पेरुन स्वतंत्र संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलाय असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. कॉर्नेल विद्यापीठाचे प्रा. कौशिक बासु यांच्याशी केलेल्या व्हर्च्युअल संवादादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

दरम्यान, अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच गांधी घराण्यातील व्यक्तीने आणीबाणी ही चूक असल्याचं मान्य केलं आहे. त्यामुळे आता याचे नेमके पडसाद राजकीय वर्तुळाता कसे उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like