सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
भाजपाचे नेते आणि केंद्रीय संरक्षणमंत्री यांनी महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरु असल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राजनाथ सिंह यांना उत्तर दिले आहे. आणि अशा पद्धतीने स्वतःचे काम करण्यास अपयशी ठरल्यामुळे लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी छोट्या राजकीय कार्यकर्त्यांसारखी टीका करणे शोभत नाही अशा शब्दांत चव्हाण यांनी राजनाथ सिंह यांना सुनावले आहे. तसेच त्यांनी आपले काम करावे, ते आपली जबाबदारी टाळत आहेत. असा अप्रत्यक्षरीत्या टोलाही चव्हाण यांनी लगावला आहे.
भाजपाच्या जनसंवाद कार्यक्रमात बोलत असताना राजनाथसिंह यांनी हे वक्तव्य केले होते. त्यांनी आम्ही त्यांना सर्वोतोपरी मदत करूनही महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या नियंत्रणात येत नसल्याचेही म्हंटले होते. यावर आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांना चांगलेच सुनावले आहे. ‘केंद्र सरकारने या अत्यंत गंभीर परिस्थतीत अनेक संकटे त्यांच्यावर असणारी जबाबदारी ही लडाखमध्ये सीमेवर जो प्रकार सुरु आहे त्याबाबत अधिकृत माहिती देणे ही आहे ती दिली पाहिजे. चीनी सैनिक भारताच्या हद्दीत घुसले आहेत का? त्यांना आपण बाहेर काढू शकलो आहोत का? अतिक्रमण झाले असेल तर ते आपण निमूटपणे सहन करतोय का? हे सांगण्याची जबाबदारी संरक्षण मंत्र्यांची आहे. ते ही जबाबदारी ते टाळत आहेत.’ असे चव्हाण यांनी म्हंटले आहे.
चव्हाण यांनी त्यांना केंद्रातील सत्ताधारी पक्ष म्हणून असणाऱ्या जबाबदारीचे पालन केले पाहिजे. असे सांगितले. तसेच राष्ट्रीय आपत्तीच्यावेळी कशा प्रकारे वक्तव्य केले पाहिजे, देशाला एक करण्यासाठी कसे प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी आपल्याकडे संकेत आहेत, असे सुनावले. स्वतःची जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरल्यामुळे दुसरीकडे कुठेतरी टीका करण्याचे साधन ते शोधत आहेत. त्यांना हे शोभत नाही आहे. असा आरोप चव्हाण यांनी केला आहे. आज देश एका बाजूला Covid च्या महामारीचा मुकाबला करतो आहे. दुसऱ्या बाजूला लडाखमध्ये भारत चीन सीमेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे याबाबत सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती दिली जात नाही. आत्ताच महाराष्ट्र निसर्ग या चक्रीवादळाच्या दुष्परिणामांचा सामना करतो आहे. अशा तिहेरी संकटांचा देश सामना करत असताना देशाला जोडण्याचे काम करण्याऐवजी छोट्या राजकीय कार्यकर्त्यांसारखी टीव्हीवर भाजपाच्या प्रवक्त्याने टीका करणे शोभत नाही. असे ते म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.