SBI अकाउंटला लवकरात लवकर आधार कार्ड करा लिंक, नाहीतर होऊ शकेल मोठे नुकसान!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशातल्या सर्वात मोठ्या सरकारी बँकेमध्ये आपले खाते असेल तर, ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. बँकेने आधारकार्ड अकाउंटला लिंक करणे बंधनकारक केले आहे. बँकेने ही माहिती सोशल मीडियावर दिली आहे. तसेच लवकरात लवकर बँकेच्या अकाउंटला आपले आधार कार्ड जोडणे बंधनकारक केले आहे. जर वेळेत आपण आपले आधार अकाउंटला लिंक केले नाही तर, आपण काही सुविधांचा लाभ घेऊ शकणार नाहीत. एटीएम इंटरनेट बँकिंग आणि बँक शाखेमध्ये जाऊन अथवा एसबीआय ॲपवरून आपण आधार कार्ड लिंक करू शकता.

केंद्र सरकारच्या डायरेक्ट मनी ट्रान्सफर या योजनेमधून वेगवेगळ्या योजनांसाठीचे पैसे डायरेक्ट खात्यामध्ये ट्रान्स्फर होतात. यामध्ये गॅस सबसिडी, इतर शासकीय फायदे यांची रक्कम डायरेक्ट अकाऊंटमध्ये जमा होत असते. आधार कार्ड अकाउंटला लिंक केले नाही तर, ही रक्कम खातेधारक काढू शकणार नाही. यामुळे बँकेने लवकरात लवकर आधार अकाउंटला लिंक करण्यासाठी ट्विट मार्फत आवाहन केले आहे.

एसबीआयच्या अकाउंटला आधार कार्ड लिंक करण्यासाठी आपण एसबीआय नेट बँकिंग, एसबीआय एटीएम, एसबीआयचे ॲप आणि बँकेच्या शाखेमध्ये जाऊन करू शकता. नेटबँकिंगमध्ये एसबीआयच्या www.sbi.co.in या वेसाइटवर जाऊन, link Aadhaar number with your bank वर क्लिक करून आधार नंबर जोडू शकता. तसेच बँकेच्या शाखेमध्ये आधार कार्डची फोटो कॉपी घेऊन, आवेदन फॉर्म भरून आधार लिंक करू शकता. एसबीआय ॲपच्या माध्यमातून आधार लिंक करणार असाल तर, ॲपमध्ये लॉगइन आयडी आणि पासवर्डच्या मदतीने तुम्ही लॉगइन करा. त्यानंतर मेन पेजवर रिक्वेस्ट बटन वरती आधार टॅबवर जाऊन आधार लिंक कर करू शकता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment