Lockdown 5.0 | पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी उद्योगांना मिळणार सूट? 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । देशातील चौथ्या टप्प्यातील संचारबंदी ३१ मे  रोजी संपत आहे. यापुढे संचारबंदी उठवली जाणार नसली तरी काही नियम शिथिल करण्यात येणार आहेत. केंद्र सरकार मुख्यत्वे देशातील १३ शहरांवर जिथे मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे, त्यांच्यावर लक्ष केंद्रित करून आहे. केंद्र सरकारला संचारबंदीमुळे घसरलेल्या अर्थव्यववस्थेला पुन्हा उभी करण्यासाठी काही राज्यांनी पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी व्यवसाय सुरु करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे संचारबंदीच्या पाचव्या टप्प्यात पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी उद्योगांना शिथिलता मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार या सूचनांचा विचार करते आहे.

केरळ, गोवा, पॉंडिचेरी यासारख्या काही राज्य आई संघराज्याची अर्थव्यवस्था ही पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. तसेच उत्तर-पूर्व काही भागातील काही राज्ये ही पूर्णतः पर्यटनावर अवलंबून आहेत. मात्र अद्याप या उद्योगांना संचारबंदीच्या नियमांमधून शिथिलता मिळाली नाही आहे. केंद्र सरकार संचारबंदीच्या पाचव्या टप्प्यात हॉटेल, रेस्टारंटस, बीच सुरु करण्याचा विचार करते आहे. राज्यांमधील आर्थिक हालचाली सुरु करण्याचा सरकार विचार करते आहे. या राज्यांनी सरकारकडे या उद्योगांवरील नियम शिथिल करून सर्व काळजी घेऊन पुन्हा हे व्यवसाय सुरु करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. पर्यटकांना सामाजिक विलगीकरण बंधनकारक करून, त्यांच्या संख्येवर मर्यादा घालून तसेच सामाजिक अलगावचे सर्व नियम पाळून पुन्हा व्यवसाय सुरु करण्याची मागणी करण्यात आली होती.

 

या राज्यांनी ते त्यांची आसनक्षमता कमी (५०%) करून हॉटेल सुरु करू शकतील असे सांगितले आहे. येणाऱ्या प्रत्येकाचे सह्रतिक तापमान तपासले जाईल व आरोग्य सेतू ऍप सर्वाना बंधनकारक केले जाईल असे त्यांनी सांगितले आहे. या माध्यमातून अर्थव्यवस्था सुरळीत होण्यास मदत होईल असेही या राज्यांनी सांगितले आहे. केंद्र सरकार अर्थव्यवस्थेला सकारात्मक रित्या पुढे घेऊन जाण्यासाठी पुढील विचार करीत आहे. दरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवर बोलल्याची माहिती आहे. त्यांनी हॉटेल व्यवसाय सुरु करण्याबाबत वरीलप्रमाणे चर्चा केली आहे. तर गोव्यातील काही जीमही पुन्हा सुरु करण्याची मागणी केली आहे. दरम्यान जून मध्ये बेंगलोर मधील हॉटेल सुरु होण्याची शक्यता आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.