हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारची सुकन्या समृद्धि योजना 2020 ही सर्वसामान्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. तुम्हालाही जर आपल्या मुलीच्या भविष्यासह चांगल्या रिटर्नची इच्छा असेल तर सुकन्या समृद्धि योजना (SSY) हा एक चांगला पर्याय असू शकतो. केंद्र सरकारच्या या योजनेत लाभार्थ्यांना तीनपटपेक्षा जास्त पैसे परत मिळू शकतात. एवढेच नव्हे तर या योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला करात सूट देखील मिळते. या योजनेंतर्गत कोणतीही व्यक्ती आपल्या मुलीच्या नावे खाते उघडू शकते, एखादी व्यक्ती केवळ दोनच मुलींचे खाते उघडू शकते आणि त्यापेक्षा अधिक खाती उघडण्यासाठी प्रतिज्ञापत्र देण्याची आवश्यकता असते. या योजनेंतर्गत दहा वर्षापर्यंतच्या मुलीच्या नावे खाते उघडले जाऊ शकते.
या खात्यात एका आर्थिक वर्षात किमान रक्कम जमा न केल्यास 15-वर्षांच्या कालावधीत ते कधीही रेग्युलराइज केले जाऊ शकते. यासाठी दरवर्षी 50 रुपये दंड भरावा लागेल.
सुकन्या समृद्धि खाते योजना 2020 डिपॉझिट
एका आर्थिक वर्षात कोणत्याही एका खात्यात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करता येते. त्याचबरोबर, एका आर्थिक वर्षात किमान डिपॉझिट रक्कम 250 रुपये आहे. म्हणजेच याचा अर्थ असा की, आपण एका आर्थिक वर्षात एका खात्यात जास्तीत जास्त दीड लाख रुपयांपर्यंत आणि किमान 250 रुपये गुंतवणूक करू शकता. जर एखाद्या व्यक्तीने चुकून या खात्यात दीड लाखाहून अधिक रुपये जमा केले तर ही रक्कम व्याजासाठी मोजली जाणार नाही. तसेच ही रक्कम ठेवीदारांच्या खात्यावर रिटर्न केले जाईल. हे खात्यात 15 वर्षांपर्यंत डिपॉझिट केले जाऊ शकते.
SSY खाते कोठे उघडले जाईल?
सुकन्या समृध्दी योजनेंतर्गत अर्जदार आपल्या मुलीच्या नावे कोणत्याही बँक किंवा टपाल कार्यालयात हे खाते उघडू शकतात. या योजनेच्या मदतीने अर्जदार त्यांच्या मुलींचे भविष्य सुरक्षित करू शकतात. या योजनेंतर्गत केवळ एकाच मुलीच्या नावाने हे खाते उघडता येईल.
कोणती कागदपत्रे दयावी लागतील ?
सुकन्या समृध्दी योजनेंतर्गत खाते उघडण्यासाठी अर्जदाराला आपल्या मुलीचा जन्माचा दाखला फॉर्मसह पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जमा करावा लागेल. त्याशिवाय मुलाचे व पालकांचे ओळखपत्र (पॅनकार्ड, रेशनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट) आणि ते कोठे राहतात याचे प्रमाणपत्र (पासपोर्ट, रेशन कार्ड, विजेचे बिल, टेलिफोन बिल, पाण्याचे बिल) सादर करावे लागतील.
किती व्याज मिळणार आहे ?
सुकन्या समृद्धि योजनेत सध्या 7.6 टक्के दराने व्याज मिळत आहे. या योजनेत खाते उघडताना जो व्याज दर राहील, त्याच दराने संपूर्ण गुंतवणूकीच्या काळात व्याज मिळते. पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट यासह सर्व लहान बचत योजनांमध्ये केलेल्या गुंतवणूकीवर सरकारने जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीत व्याज दरात बदल केलेला नाही.
मॅच्युरिटीनंतर तुम्हाला सध्याच्या व्याज दराप्रमाणे 64 लाख रुपये मिळतील, जर प्रत्येक आर्थिक वर्षात 15 वर्षांसाठी 1.5 लाख रुपये जमा केले तर तुमची जमा केलेली एकूण रक्कम 22,50,000 रुपये असेल आणि त्यावरील व्याज 41,36,543 असे तयार होईल. मात्र, 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर हे खाते मॅच्युर होईल. अशा परिस्थितीत खात्यावर जमा केलेल्या रकमेवर व्याज दिले जाईल. 21 वर्षांसाठी ही रक्कम व्याजासह सुमारे 64 लाख रुपयांवर जाईल. आपणास इथे हे लक्षात ठेवले पाहिजे की, केंद्र सरकार प्रत्येक तिमाहीत सुकन्या समृद्धि योजनेवरील व्याज ठरवते. अशा परिस्थितीत, मॅच्युरिटीपर्यंत व्याज दरात अनेक वेळा बदलला जाऊ शकतो.
खात्याला रिन्यू कसे केले जाईल?
जर तुम्ही सुकन्या समृद्धि योजनेंतर्गत उघडलेल्या खात्यात सातत्याने पैसे जमा केले नाहीत तर तुमच्याकडे जमा असलेल्या रकमेवर पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यावर मिळालेल्या व्याजापेक्षा जास्त पैसे मिळतील. आपण कोणत्याही वर्षी किमान रक्कम जमा करण्यास सक्षम नसल्यास, नंतर आपण 50 रुपये दंड देऊन हे पुन्हा नियमित करू शकता.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”