मुंबई | मान्सूनचं भारताच्या दक्षिणपश्चिम भागात आगमन झालं आहे. कर्नाटक, तामिळनाडू, रायलसीमा भाग, आंध्रप्रदेशचा काही हिस्सा, बंगालचा उपसागर या भागांमध्ये मान्सूनच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत. याशिवाय ईशान्य भारतातही पावसाला सुरुवात झाली आहे.
निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर महाराष्ट्रातील वातावरणीय परिस्थिती मात्र काही अंशी पूर्ववत होत असून महाराष्ट्रातही येत्या २ ते ३ दिवसांत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये थंडगार वाऱ्यांसहित पावसाच्या हलक्या सरी रविवारी सकाळपासून कोसळल्याचं पाहायला मिळालं. देशातील कमाल तापमानाची नोंद ही ३६ डिग्री सेल्सिअस असल्याचं भारतीय हवामान खात्याच्या कुलदीप श्रीवास्तव यांनी सांगितलं.
पश्चिम हिमालयात सुरू असलेल्या वादळी वाऱ्यांचा परिणाम भारतातील काही भागांवर होऊन विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.