महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नवीन, त्यांच्याकडे प्रशासकीय अनुभव नाही – देवेंद्र फडणवीस 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । राजकारणात वाद-प्रतिवाद होत असतात. महाराष्ट्राच्या राजकारणात तर ते सातत्याने होत राहतात. आपल्या विरोधकांच्या चुका शोधणे, त्या सातत्याने लोकांसमोर विविध माध्यमातून मांडत राहणे हे महाराष्ट्राला नवीन नाही. मग कोरोना संकटकाळात तर अशी संधी कोण कशी सोडेल? महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोना सुरु झाल्यापासून सध्याच्या सरकारच्या चुकांचा पाढाच वाचत आहेत. त्यातच त्यांनी आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नवीन आहेत आणि त्यांना प्रशासनाचा कोणताच अनुभव नाही असे विधान केले आहे.

देशाच्या तुलनेत अधिक प्रमाणात रुग्ण हे महाराष्ट्रात सापडले आहेत. त्यातही मुंबईतील रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. रोज संख्या वाढते आहे. या सगळ्याला सध्याचे सरकार कारणीभूत आहे. असे फडणवीस यांनी म्हंटले आहे. ते म्हणतात महाराष्ट्र सर्वाधिक संक्रमित राज्य आहे आणि मुंबईची अवस्था तर हातातून गेल्याचे दिसून येत आहे. हे केवळ आताच्या सरकारमुळे कारण सर्वप्रथम संचारबंदी लागू झाल्यापासून रणनीतीपुर्वक हे सरकार चुका करते आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नवीन आहेत आणि त्यांना प्रशासनाचा अनुभव नाही आहे.

 

देवेंद्र फडणवीस सध्या सतत राज्यपालांना भेटत असल्यामुळे चर्चेत आहेत. आता असे विधान करून पुन्हा एकदा त्यांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचे संकट वाढत आहे. प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या उपाययोजना राबविण्यात कमी पडत असल्याचे फडणवीस यांचे म्हणणे आहे. तर काल भाजपा नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांनीही उद्धव ठाकरे यांना युती तोडण्याचा फुकटचा सल्ला दिला होता.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.