सभ्य व्यक्तीसुद्धा सत्तेत आल्यानंतर अन्याय कसा करू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पृथ्वीराज चव्हाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे राजकारणात एक वेगळी ओळख आहे. चव्हाण मुख्यमंत्री असताना ऊस दरवाढ आंदोलनाने चांगलाच पेट घेतला होता. तेव्हा स्वाभिमानी शेटकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी राज्याभर आंदोलनाची ठिणगी पेटवली होती. त्यावेळी घडलेल्या काही घटनांना मध्यस्थानी ठेऊन तेव्हाच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल केले होते. आज माजी खासदार राजू शेट्टी, आमदार सदाभाऊ खोत यांच्यावरील दाखल असेलेल्या एकूण ४७ केसमधून कोर्टाकडून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. यावेळी बोलताना सदाभाऊ खोत यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या हल्लाबोल केला. सभ्य व्यक्तीसुद्धा सत्तेत आल्यानंतर अन्याय कसा करू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांनी शेतकर्‍यांवर दाखल केलेले गुन्हे होय असं म्हणत खोत यांनी चव्हाण यांच्यावर निशाणा साधला.

कराड सत्र न्यायालयाने निकाल जाहीर केल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमच्यावर घटले दाखल झाले तेव्हा यशवंतराव चव्हाण यांच्या मातीतील पृथ्वीराज चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री होते. आणि त्यांच्याकडून खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे भले होईल अशा अपेक्षा होत्या. मात्र त्यांनी या सर्व अपेक्षा धुळीला मिळाल्या. एखादा सभ्य व्यक्तीसुद्धा राजकारणाच्या पटलावर सत्तेत आल्यानंतर अन्याय कसा करू शकतो त्याचे एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांनी शेतकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे हे आहे असा आरोपही सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

दरम्यान, इंदापूरात आंदोलन करत असताना आम्ही काही कारणांनी जेलमध्ये गेलो. त्यावेळी आम्ही जेलमध्ये असताना शेतकऱ्याकडून बाहेर काही कृती सुरु होत्या. मात्र सदर कृत्यांत आम्ही जेलमध्ये असूनही आमचा सहभाग होता असे समजून त्यावेळच्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने आमच्यावर गुन्हे दाखल केले असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.